अल्टिमेटम मिळताच इंडिगोची मोठी घोषणा, एअरबसकडून मागवली आणखी ३० मोठी विमाने
तुर्की एअरलाइन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार संपवण्याचा अल्टिमेटम मिळाल्याच्या २४ तासांतच इंडिगोने मोठी घोषणा केली आहे. भारतातील सर्वांत मोठी विमान कंपनी इंडिगोने एअरबसकडून आणखी ३० मोठ्या आकाराचे A३५० विमाने मागवली आहेत. इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स यांनी ही घोषणा केली. कंपनीने अधिक शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
रांचीमध्ये थरार! ४ हजार फुटांवर प्रवाशांचा जीव धोक्यात; ४० मिनिटे हवेत अडकली Flight, नेमके काय घडले?
शनिवारी सरकारने इंडिगोला तुर्की एअरलाइन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार संपवण्याचे निर्देश दिले. भारत आणि तुर्कीमधील वाढत्या राजनैतिक तणावाच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान तुर्कीने पाकिस्तानला उघडपणे मदत केली. या करारांतर्गत, इंडिगो तुर्की एअरलाइन्सकडून दोन मोठी विमाने (बोईंग ७७७) भाड्याने घेऊन दिल्ली आणि मुंबईहून इस्तंबूलला उड्डाणे चालवत होती. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगोला तुर्की एअरलाइन्सकडून घेतलेल्या दोन बोईंग ७७७-३००ER विमानांसाठी ‘वेट लीज करार’ फक्त तीन महिन्यांसाठी वाढवण्याची परवानगी दिली.
यानंतर फक्त एक दिवस, रविवारी, इंडिगोने एक मोठी घोषणा केली, इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले की कंपनीने एअरबसवडून ३० नवीन ३५० विमाने मागवली आहेत. त्यांनी सांगितले की ७० विमानांच्या पर्यायांपैकी सच्या ३० विमाने मागवली जात आहेत. येत्या काळात एअरलाइनला ९०० हून अधिक विमाने मिळणार आहेत. इंडिगो मार्च २०२६ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात बोईंग ७८७विमाने भाङधाने घेऊन १० नवीन परदेशी शहरांमध्ये उठणे सुरू करेल. पीटर एल्बर्स म्हणाले, ‘आम्ही दर आठवडद्याला एक विमान जोडत राहू आणि या दशकाच्या अखेरीस ते दुप्पट करू.”