आज भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 79 वी जयंती (Rajiv Gandhi Birth Anniversary) आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी रविवारी लडाखमधील पँगोंग त्सो तलावाच्या काठावर त्यांना श्रद्धांजली वाहिली. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त लडाखमधील पँगॉन्ग त्सो सरोवराच्या काठावर प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये राहुल गांधीही सहभागी झाले होते. राहुल गांधी लेह येथून मोटारसायकलने लडाखमधील पँगॉन्ग त्सो येथे पोहोचले होते.
[read_also content=”आता इस्रोचं चांद्रयान चंद्रापासून अवघं २५ किमी दूर, लँडिंगच्या तयारीत! https://www.navarashtra.com/india/isros-chandrayaan-is-just-25-km-away-from-the-moon-preparing-for-landing-nrps-447044.html”]
प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “चीनने इथल्या जमिनीवर कब्जा केला आहे. त्याचा इथल्या लोकांवर परिणाम झाला आहे. त्या जमिनीवर लोक जनावरे चरत होते. इथे प्रत्येकजण म्हणतोय की चिनी सैन्य घुसले आहे. याआधी हे लोक होते. त्यांची जनावरे चरायलाही जाता येत नाही. पंतप्रधान म्हणतात की चीनने एक इंचही जमीन घेतली नाही, हे खरे नाही.”
राहुल गांधी म्हणाले की, “आम्ही भारत जोडो यात्रेदरम्यान लडाखला येणार होतो, पण तार्किक कारणांमुळे येऊ शकलो नाही. त्यामुळे मी लडाखला भेट देण्याचा सविस्तर प्लॅन केला होता. मी लेहला गेलो होतो. मी आलो आहे. पॅंगॉन्गला. आता लुब्रा आणि कारगिल.” जाणार. जनतेच्या मनात काय आहे ते ऐकणार. लडाखमध्ये अनेक तक्रारी आहेत. त्यांना मिळालेल्या दर्जावर ते खूश नाहीत. त्यांना प्रतिनिधित्व हवे आहे. लोक म्हणत आहेत की नोकरशाहीतून राज्य चालवता कामा नये. जनतेच्या आवाजातून राज्य चालले पाहिजे.”
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या वडिलांचं स्मरण करताना राहुल गांधींनी लिहिलं की, “पप्पा, तुमच्या डोळ्यांत भारतासाठी जी स्वप्नं होती, ती या अनमोल आठवणींमधून दिसतायत. तुमची स्वप्न हाच माझा मार्ग आहे – प्रत्येक भारतीयाचा संघर्ष आणि स्वप्न समजून घेतोय, भारत मातेचा आवाज ऐकतोय.”
#WATCH | Congress MP Rahul Gandhi pays tribute to his father and former Prime Minister Rajiv Gandhi on his birth anniversary from the banks of Pangong Tso in Ladakh pic.twitter.com/OMXWIXR3m2
— ANI (@ANI) August 20, 2023