पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; राज्यात जून महिन्याच्या 'या' तारखेपासून मान्सून सक्रिय होणार
नवी दिल्ली : सध्या उष्णतेमुळे नागरिक चांगले हैराण होत आहे. त्यातच आता उत्तर भारतातील बहुतेक भागात जोरदार वाऱ्यांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांमध्ये जोरदार वारे वाहण्यासह तापमानात घट होईल. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर, तापमान पुन्हा वाढेल आणि 40 अंशांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, डोंगराळ भागात अजूनही पाऊस आणि बर्फवृष्टीचा जोर कायम आहे.
उत्तर प्रदेशात उष्णता वाढत आहे. येथील कडक उन्हामुळे लोक बाहेर पडणे टाळत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांचे कमाल तापमान 40 अंशांपर्यंत वाढले आहे. येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती, कुल्लू, कांगडा आणि किन्नौर जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे उंच डोंगराळ भागात तापमानात 2 ते 3 अंशांची घट होईल, असा अंदाज आहे. उत्तराखंडच्या उंच भागात बर्फवृष्टी आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा अभाव राहील, ज्यामुळे तापमानात वाढ होऊन उन्हाळ्याची सुरुवात होईल.
केरळमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’
केरळच्या अनेक भागात मुसळधार पावसानंतर, शुक्रवारी संध्याकाळी आयएमडीने राज्यातील 14 पैकी चार जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला. इडुक्की, त्रिशूर, पलक्कड आणि मलप्पुरमसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने तिरुअनंतपुरम, कोल्लम, पथनमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांमध्ये एक-दोन ठिकाणी गडगडाटी वादळासह मध्यम पाऊस आणि 40 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे. ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्याने सहा सेमी ते २० सेमी पर्यंत खूप मुसळधार पाऊस पडू शकतो.
महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज
हवामान विभागाने, राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. गेले दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस कोसळत आहे, कडक उन्हाळ्यात पाऊस आल्याने काही ठिकाणी थंडावा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासाह पाऊस झाल्याने व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, पुन्हा एकदा राज्याला अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना ‘हाय अलर्ट’ देण्यात आला आहे.