Water release begins as Koyna Dam is 100 percent full Satara Rain Update
कोयना धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मंगळवारी (दि. १९) दुपारी ३ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ९ फुटांवरून ११ फुटापर्यंत उघडून ७८,४०० क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २ हजार १०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीत एकूण ८० हजार ५०० क्युसेक्स विसर्ग सुरू झाला आहे
कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशय पाणलोट क्षेत्रातील पाऊस प्रचंड वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे ८ फुटांवरून ९ फूट उघडून नदीपात्रात प्रतिसेंकद ६५ हजार ६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला.
नदीपात्रात एकूण ६७,७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. मात्र तरीही धरणातील पाणी वाढत असल्याने दुपारी ३ वाजता दरवाजे ११ फूट उघडून नदीपात्रात पायथा वीजगृह व दरवाजे असा एकूण ८० हजार ५०० क्युसेक्स विसर्ग सुरू झाला आहे.
कोयना नदी परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे पाटण शहरालगतचा मुळगाव पूल पाण्याखाली गेला आहे. मुळगाव, ता. पाटण येथील पाण्याखाली गेलेला पूलाचे फोटो देखील समोर आले आहेत.
त्याचबरोबर नेरळे येथील पुलाला पाणी लागले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा पोलीसांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर पुलाला जाणारा पूल हा बॅरिकेट लावून बंद करण्यात आला आहे
कोयनानगर जवळील हेळवाक येथील कराड चिपळूण मार्गावर रस्त्यावर पाणी आले असून पुढे कुंभार्ली घाटात दरड कोसळली आहे. तसेच चिपळूण जवळील खेर्डी येथेही या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कराड चिपळूण मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पाटण तालुक्यातील मुळगाव येथील पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावरुन प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तुफान पावसाने साताऱ्याला झोडपले आहे. पावसाचे प्रमाण जास्त असून संततधार सुरुच आहे. तुफान पावसामुळे जमीन खचल्याने कोयना नवजा रस्त्याला तडे गेले आहेत. जमीनीला भेगा पडल्यासारखे भयावह दृश्य दिसत आहे.