Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Attack: निर्णय घ्यायला विलंब, काश्मीरचा अर्धा भाग पाकीस्तानकडे; काय आहे पाकव्याप्त काश्मीरचा इतिहास ?

कश्मीर या स्वर्गाचा दिवसेंदिवस नरक होत चालला आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पहलगाम येथील दहशतवादी हल्ला. असे कित्येक हल्ले हे सीमाभागात होत असातात. कधी ते समोर येतात तर कधी येत नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 27, 2025 | 06:49 PM
निर्णय घ्यायला विलंब, काश्मीरचा अर्धा भाग पाकीस्तानकडे; काय आहे पाकव्याप्त काश्मीरचा इतिहास ?

निर्णय घ्यायला विलंब, काश्मीरचा अर्धा भाग पाकीस्तानकडे; काय आहे पाकव्याप्त काश्मीरचा इतिहास ?

Follow Us
Close
Follow Us:

“दूध मांगोगे तो खीर देंगे लेकीन कश्मीर मांगोगे तो चीर देंगे” या वाक्याचं कारण म्हणजे भारत पाकीस्तान सीमावाद. कश्मीर, ज्याला भारताचं नंदनवन म्हटलं जातं. असं म्हणतात मेल्यावर स्वर्ग दृष्टीस पडतो मात्र जीवंतपणी अनुभवायला मिळणारा स्वर्ग म्हणजे कश्मीर. मात्र या मन वेधून घेणाऱ्या सौंदर्याला श्राप आहे, ग्रहण लागलंय ते दशवादी संघटनेचं. सीमाभागात आणि पाकव्याप्त काश्मीर भागात असलेले दशवाद्याचं तळ आणि सतत होणारे घातपात यामुळे या स्वर्गाचा दिवसेंदिवस नरक होत चालला आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पहलगाम येथील दहशतवादी हल्ला. असे कित्येक हल्ले हे सीमाभागात होत असातात. कधी ते समोर येतात तर कधी येत नाही.

पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याच्या देशातील प्रत्येक नागरिकाकडून तीव्र निषेध केला जात आहे. काश्मीरच्या सीमाभागात कायमच दहशतवाद्यांकडून कुरघोड्या केल्या जातात. या दहशतवाद्यांचं सगळ्यात मोक्याचं ठिकाण म्हणजे पाकव्याप्त कश्मीर. हे पाकव्यप्त कश्मीर प्रकरण नेमकं आहे तरी काय हे जाणून घेऊयात.

Indus Water Treaty: सिंधू पाणी कराराला स्थगिती; अखेर भारत किती काळ पाकिस्तानचे पाणी रोखून धरणार?

फाळणीच्या आधीपासून काश्मीरमध्ये महाराज हरी सिंग यांचं राज्य होतं. जम्मू आणि काश्मीरमध्ये  सत्ता असलेले ते शेवटचे राजे होते. 1947 मध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाली. यावेळी काश्मीरचा प्रश्न गंभीर होता. त्यावेळी महाराज हरी सिंग हे काश्मीरचे राज्यकर्ते असल्याने त्यांच्यासमोर दोन पर्याय होते. भारतात सामील होण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा. मात्र हरी सिंग यांना दोन्ही पर्याय मान्य नव्हते. त्यांना काश्मीर स्वतंत्र राष्ट्र म्हणून हवं होतं. मात्र योग्य तो निर्णय घेण्यासाठी हरी सिंग यांना बराच वेळ लागला. पाकीस्तान आणि भारताच्या सीमाभागातील काही मुस्लीम लोकांनी हरी सिंग यांच्या विरोधात संघटना उभी केली. ही संघटना हळू हळू बळकट होऊ लागली. त्यानंतर हरी सिंग यांना आपलं राज्य धोक्यात असल्याचं कळून चुकलं.

या सगळ्या घटनेनंतर, हरी सिंग यांनी भारतीय लष्कराकडे मदत मागितली. भारत सरकारने देखील हरी सिंग यांनी मदत करण्याचा शब्द दिला. मात्र यावेळी भारत सरकारने हरी सिंग यांच्यासमोर काही अटी ठेवल्या होत्या. त्या अटी अशा होत्या की, भारतीय लष्कर हरी सिंग यांना मदत करेन.  मात्र हरी सिंग यांनी घोषित करावं की जम्मू आणि काश्मीर हे भारतात अविभाज्य हिस्सा आहे. भारतीय दळणवळणासाठी काश्मीर आणि जम्मू हे महत्त्वाचे आहेत. भारत सरकारची ही अट मान्य करण्याशिवाय हरी सिंग यांच्याकडे पर्याय नव्हता. हरी सिंग यांनी भारत सरकारची अट मान्य केली. मात्र हा निर्णय घेई पर्यंत हरी सिंग यांना उशिर झाला होता.  दरम्यानच्या त्या काळात ज्या मुस्लीम संघटना बळकट होत गेली त्या संघटनेने कश्मीरचा काही भाग बळकवला. हा तोच भाग आहे जो आता POK म्हणजे पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो.

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन, रात्रभर LoCवर गोळीबार; भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर

हा पाकव्याप्त कश्मीर भारतात पुन्हा यावा यासाठी लष्कराकडून शक्य तो सगळे प्रयत्न आजवर होत आहे. या पाकव्याप्त कश्मीर परिसरात मोठ्या प्रमाणात पारीस्तानी लष्कर दहशतवाद्यांना पोसत असतात. कश्मीरचा हा भाग पुन्हा भारतात परत येईल का ? आता तरी सरकार यावर ठोस पाऊलं उचलणार का ? हे येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईल.

 

 

 

Web Title: Raja harisingh pahalgam attack delay in decision making half of kashmir belongs to pakistan what is the history of pakistan occupied kashmir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • indian army news
  • Jammu Kashimir
  • pahalgam attack

संबंधित बातम्या

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली
1

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली

‘शेजारी देश दहशतवादाचा कारखाना’ ; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जयशंकर यांनी केला पाकिस्तानचा पर्दाफाश
2

‘शेजारी देश दहशतवादाचा कारखाना’ ; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जयशंकर यांनी केला पाकिस्तानचा पर्दाफाश

भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही पहलगाम हल्ल्याच्या आधी शूट झाला होता तरी…’
3

भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही पहलगाम हल्ल्याच्या आधी शूट झाला होता तरी…’

Yashomati Thakur News: जय शाहाला ‘नाही’ म्हणायला मोदीजी घाबरत आहेत का? भारत-पाकिस्तान सामन्यावरून काँग्रेसने तोफ डागली
4

Yashomati Thakur News: जय शाहाला ‘नाही’ म्हणायला मोदीजी घाबरत आहेत का? भारत-पाकिस्तान सामन्यावरून काँग्रेसने तोफ डागली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.