Ram Darbar Pran Pratishtha at Ram Temple in Ayodhya in the presence of CM Yogi Adityanath
अयोध्या : श्री रामजन्मभूमी असलेली अयोध्यानगरी पुन्हा एकदा सजली आहे. अयोध्येतील राम मंदिरामध्ये राम दरबारची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा अयोध्येमध्ये श्री रामांच्या नावाजा जयघोष ऐकायला मिळाला आहे. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर बांधलेल्या राम दरबाराचा अभिषेक पूर्ण विधी आणि धार्मिक विधींसह पार पडला आहे. या सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे राम दरबाराच्या प्राण प्रतिष्ठासाठी १०१ शंकराचार्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मंत्रमुग्ध पद्धतीने खास आमंत्रित केलेल्या शंकराचर्यांनी राम दरबाराची प्राण प्रतिष्ठा केली आहे. आज, गंगा दशहराच्या शुभ मुहूर्तावर, अयोध्येत राम दरबार आणि गर्भगृहाच्या चारही कोपऱ्यांवर बांधलेल्या तटबंदीसह इतर मंदिरांचा अभिषेक करण्यात आला. आहे. प्राण प्रतिष्ठानसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पाचशे पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आजच्या मुहूर्ताचे महत्त्व काय?
हिंदू धर्मग्रंथांनुसार, गंगा दशहरा हा तो दिवस आहे जेव्हा राजा भगीरथाच्या तपश्चर्येने प्रेरित होऊन पवित्र गंगा नदी भगवान शिवाच्या कुंडातून पृथ्वीवर अवतरली. म्हणूनच हिंदू धर्मात हा दिवस खूप खास मानला जातो. आजच्या मुहूर्तावर अध्योध्येतील राम मंदिरामध्ये राम दरबारच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे. यामध्ये प्रभू श्री राम हे राजा तर त्यांच्यासह सीता, हनुमान, लक्ष्मण आणि भरत यांच्या देखील मुर्ती बसवण्यात आल्या आहेत. नेत्रदीपक अशा या राम दरबारने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी सांगितले की, “प्राणप्रतिष्ठा सोहळा सकाळी 11.25 ते 11.40 या वेळेत झाला. मुख्य राम दरबार व्यतिरिक्त, राम मंदिर संकुलातील इतर आठ मंदिरे देखील पवित्र करण्यात आली. त्यांनी सांगितले की, हे समारंभ पूर्ण धार्मिक विधी आणि वैदिक मंत्रांसह पार पडले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री योगींनी रामलल्लाची पूजा केली
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम दरबाराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अयोध्येत पोहोचले. ते प्रथम हनुमान गढी येथे गेले आणि प्रार्थना केली. यानंतर राम मंदिरात जाऊन रामलल्लाची पूजा केली. यानंतर सोशल मीडिया पोस्टमध्ये योगी आदित्यनाथ यांनी लिहिले आहे की, भगवान श्री राम यांच्या पवित्र जन्मभूमी, अयोध्या धाममध्ये, श्री राम जन्मभूमी मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील श्री राम दरबारासह आठ मंदिरांमधील देवांच्या पवित्र मूर्तींच्या प्राण-प्रतिष्ठेसाठी आयोजित कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याचे मोठे भाग्य आपल्याला मिळत आहे. हा शुभ प्रसंग ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ ची एक नवीन अभिव्यक्ती आहे. सियावर श्री रामचंद्रकी जय, अशा भावना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केल्या आहेत.
प्रभु श्री राम की पावन जन्मभूमि अयोध्या धाम में आज श्री राम जन्मभूमि मंदिर के प्रथम तल पर श्री राम दरबार सहित अष्ट देवालयों में पवित्र देव विग्रहों की प्राण-प्रतिष्ठा हेतु आयोजित कार्यक्रम का साक्षी बनने का परम सौभाग्य प्राप्त हो रहा है।
यह पावन अवसर ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ की…
— Yogi Adityanath (@myogiadityanath) June 5, 2025