Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratan tata death live updates : महाराष्ट्र उद्योग भवनला रतन टाटा यांचे नाव; भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस

Ratan Tata death news updates : उद्योगजगतातील महत्त्वपूर्ण व्यक्तीमत्त्व असलेले रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला आहे. यामुळे फक्त देशावर नाही तर संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे. मुंबई पोलिसांकडून मानवंदना दिली जाणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 10, 2024 | 03:04 PM
Ratan Tata death news live updates

Ratan Tata death news live updates

Follow Us
Close
Follow Us:

Ratan Tata death news live updates : उद्योगक्षेत्रातील चाणक्य आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे भारताच्या उद्योगजगतात मोठी शोककळा पसरली आहे. जगभरातून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.  रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, त्यांचे उपचारादरम्यानच निधन झाले. रतन टाटा यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. मुंबई पोलिसांकडून पद्मविभूषण रतन टाटा यांना मानवंदना देण्यात आली आहे.रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळला जाणार आहे. सध्या त्यांचे पार्थिव राहत्या कोलाबा येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

The liveblog has ended.
  • 10 Oct 2024 02:07 PM (IST)

    10 Oct 2024 02:07 PM (IST)

    महाराष्ट्र उद्योग भवनला रतन टाटा यांचे नाव

    उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. जगभरामध्ये आपल्या कार्याने वेगळी ओळख निर्माण करणारे रतन टाटा यांचा महाराष्ट्र सरकारकडून मरणोत्तर सन्मान दिला जात आहे. महाराष्ट्र उद्योग भवनाचे नाव बदलण्यात आले असून रतन टाटा उद्योग भवन असे नवीन नाव देण्यात आले आहे. त्याचबरोबर  महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कारामध्ये सुद्धा बदल करण्यात आला आहे. रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असे पुरस्कारचे नवीन नाव असणार आहे. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. त्याचबरोबर रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार येण्यात यावा असा प्रस्ताव देखील महाराष्ट्र सरकारकडून केंद्राकडे करण्यात आली आहे.

  • 10 Oct 2024 01:50 PM (IST)

    10 Oct 2024 01:50 PM (IST)

    'एक युगाचा अंत'; रतन टाटा यांच्या निधनाने अमिताभ बच्चन झाले भावूक

    बॉलिवूडचे स्टार अमिताभ बच्चन यांनी रतन टाटा यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला. टाटांच्या निधनाने एका युगाचा अंत झाल्याचे ते म्हणाले. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले एक युग संपले. अत्यंत आदरणीय, विनम्र पण दूरदृष्टी असलेले नेते रतन टाटा यांच्यासोबत घालवलेल्या विशेष क्षणांची आठवण करून देताना ते म्हणाले की, आम्ही अनेक मोहिमांमध्ये त्यांच्यासोबत खूप छान क्षण घालवले. माझी प्रार्थना. अशा भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केल्या आहेत.

  • 10 Oct 2024 01:45 PM (IST)

    10 Oct 2024 01:45 PM (IST)

    केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वाहिली श्रद्धांजली

    देशाच्या खऱ्या 'रतन'ला विनम्र अभिवादन ! पद्मविभूषण रतन टाटा जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. रतनजींचे साधे आणि विनम्र व्यक्तिमत्व येत्या अनेक वर्षांपर्यंत करोडो भारतीयांसाठी प्रेरणादायी राहील.रतन टाटाजींच्या आत्म्याला मोक्ष मिळो अशी मी देवाला प्रार्थना करतो, अशा भावना केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलधीर मोहोळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

    The nation lost it’s true Ratan..

    Beyond saddened to know that Padma Vibhushan Shri. Ratan Tata ji is no more with us.

    Ratan ji, the man of grace & honour will forever be remembered as a timeless inspiration for all the Indians, for years to come.

    My heartfelt condolences to… pic.twitter.com/uYYmqGEyFm

    — Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 9, 2024

  • 10 Oct 2024 12:54 PM (IST)

    10 Oct 2024 12:54 PM (IST)

    रतन टाटा यांच्यावर पारसी प्रथेनुसार अंत्यसंस्कार

    रतन टाटा यांचे पार्थिव दुपारी ४ वाजेपर्यंत एनसीपीए येथे ठेवण्यात येणार असून, त्यानंतर अंत्ययात्रा निघणार आहे. रतन टाटा यांच्यावर पारसी प्रथेनुसार त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील. रतन टाटा यांच्यावर वरळीच्या स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचले. त्याठिकाणी त्यांनी आढावा घेतला आहे.

  • 10 Oct 2024 12:16 PM (IST)

    10 Oct 2024 12:16 PM (IST)

    RBI गव्हर्नर यांनी घेतले रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन

    RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मुंबई येथील एनसीपीए येथे रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. शक्तीकांत दास यांनी अंतिम श्रद्धांजली वाहत त्यांना खरे दूरदर्शी व्यक्ती अशी उपमा दिली. शक्तीकांत दास म्हणाले की, “मला वाटते जेव्हा जेव्हा आधुनिक भारताचा आर्थिक इतिहास लिहिला जातो तेव्हा मला असे वाटते की त्यांच्या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी पूर्ण खंड पुरेसा नाही... त्यांना खरे आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील नैतिकतेवर दृढ विश्वास ठेवणारे ते होते. भारताचा एक महान सुपुत्र आणि एक अभूतपूर्व व्यक्ती. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,” अशा भावना दास यांनी व्यक्त केल्या.

  • 10 Oct 2024 12:07 PM (IST)

    10 Oct 2024 12:07 PM (IST)

    राज ठाकरेंनी घेतलं पार्थिवाचे दर्शन

    उद्योगपती रतन टाटा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये विलक्षण नाते राहिलेले आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यावेळी त्यांनी सगळ्या आठवणींना उजाळा देत प्रकल्पासाठी मदत केल्याची आठवण सांगितली होती. यानंतर आता NCPA या ठिकाणी रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे . राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे.

  • 10 Oct 2024 11:47 AM (IST)

    10 Oct 2024 11:47 AM (IST)

    सायंकाळी 4 नंतर नरिमन पॉईट ते वरळी अंत्ययात्रा

    रतन टाटा यांचे पार्थिव सायंकाळी 4 पर्यंत NCPA या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.  सायंकाळी 4 नंतर नरिमन पॉईट ते वरळी अशी अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर वरळी येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या स्मशानभूमीची मुंबई पलिका आयुक्तांनी पाहणी केली आहे. तसेच तयारीचा आढावा घेतला आहे. विद्युतदाहिनीमध्ये रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून यावेळी अतिमहत्त्वाचे लोक फक्त उपस्थित राहणार आहे. रतन टाटा यांच्या अंत्यविधीवेळी केवळ मोजक्याच लोकांची उपस्थिती राहणार आहे.

  • 10 Oct 2024 11:35 AM (IST)

    10 Oct 2024 11:35 AM (IST)

    भारतातील अमेरिकेच्या दूतवासाने वाहिली श्रद्धांजली

    भारतातील यूएस राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी शोक व्यक्त करत आणि दिवंगत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या आठवणी सांगितल्या एक महाकाय गमावला आहे अशा भावना भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले की, "भारताने आणि जगाने एक विशाल हृदय असलेला एक दिग्गज गमावला आहे. जेव्हा मला राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले, तेव्हा रतन टाटा यांनी भारतातून पहिले अभिनंदन केले, ज्यांनी माझ्या गावासाठी खूप काही दिले आणि विद्यापीठाच्या संचालक मंडळावर सेवा दिली. दक्षिण कॅलिफोर्नियाचे त्यांनी आपल्या देशासाठी अधिक समृद्धी आणि समानतेचे भविष्य पाहिले आणि आपल्या जगासाठी खूप काही केले," अशा भावना एरिक गार्सेटी यांनी व्यक्त केल्या आहेत.

  • 10 Oct 2024 10:57 AM (IST)

    10 Oct 2024 10:57 AM (IST)

    शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन

    उद्योगमंत्री रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव NCPA येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. सायंकाळी 4 वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील लोक रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी येत आहे. आता जेष्ठ नेते शरद पवार व लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे. शरद पवार यांनी रतन टाटा यांना आदरांजली वाहिली आहे. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

    #WATCH | NCP-SCP chief Sharad Pawar and Supriya Sule pay last respects to Ratan Tata at NCPA grounds in Mumbai pic.twitter.com/euNCRNRLq1

    — ANI (@ANI) October 10, 2024

  • 10 Oct 2024 10:52 AM (IST)

    10 Oct 2024 10:52 AM (IST)

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वाहिली श्रद्धांजली

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत सीतारमण यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, श्री रतन टाटा यांच्या निधनाने दु:ख झाले, एक उत्कृष्ट नेता, दूरदर्शी उद्योगपती आणि परोपकारी, ज्यांच्या योगदानाने आपल्या समाजावर कधीही न पुसणारी छाप सोडली आहे.नाविन्यपूर्ण, नैतिक व्यवसाय पद्धती आणि सामाजिक जबाबदारीचा त्यांचा सखोल निश्चय उद्योग आणि समुदायांमध्ये बदल घडवून आणला. त्यांचे कुटुंब, मित्र आणि ज्यांच्या जीवनाला त्यांनी स्पर्श केला त्या सर्वांप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांचा उल्लेखनीय वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, अशा भावना  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण व्यक्त केल्या आहेत.

  • 10 Oct 2024 10:34 AM (IST)

    10 Oct 2024 10:34 AM (IST)

    सुधा मूर्ती यांनी व्यक्त केल्या भावना

    रतन टाटा यांच्या निधनानंतर उद्योगक्षेत्रातून शोककळा व्यक्त केली जात आहे. लेखिका आणि राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांनी देखील रतन टाटा यांना आदरांजली व्यक्त केली. सुधा मूर्ती म्हणाल्या की, आपण कधीच जमशेदजी टाटा यांना कधीच पाहिले नाही. लोकांनी त्यांच्याबद्दल अतिशय प्रामाणिक आणि साधे व्यक्तीमत्त्व असे लिहिले ते आपण वाचलं आहे. पण मी रतन टाटा यांना भेटले, जे अतिशय प्रेमळ, एक सचोटी आणि साधेपणाचे, नेहमी इतरांची काळजी घेणारे आणि दयाळू असे वाटले आहे. मला वाटत नाही की मी त्यांच्यासारखा कोणाला भेटली आहे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, त्याचे एक युग होते. माझ्यासाठी ते एक सच्चा माणूस होते. मला आता माझ्या वैयक्तिक आयुष्यात नुकसान झाले असल्याचे वाटत असून पोकळ वाटत आहे, अशा भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केल्या आहेत.

    #WATCH | Bengaluru, Karnataka | On the demise of Ratan Tata, author-philanthropist and Rajya Sabha MP Sudha Murty says, "... In my life, I met him (Ratan Tata), a man of integrity, and simplicity, always caring for others and compassionate... I really miss him... I don't think in… pic.twitter.com/hDb6Qbfhau

    — ANI (@ANI) October 10, 2024

  • 10 Oct 2024 10:19 AM (IST)

    10 Oct 2024 10:19 AM (IST)

    रतन टाटा यांचे पार्थिक NCPA येथे अंत्यदर्शनासाठी

    उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव रुग्णालयातील त्यांच्या कोलाबा येथील निवासस्थानी आणण्यात आले आहे. त्यांचे पार्थिव NCPA येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. याठिकाणी सायंकाळी 4 वाजेपर्यंत दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. NCPA येथे रतन टाटा यांच्या नातेवाईकांची आणि आप्तेष्टांची मोठी गर्दी झाली आहे. पारसी समाजातील बांधव मोठ्या प्रमाणामध्ये रतन टाटा यांना निरोप देण्यासाठी दाखल झाले आहेत.

     

    #WATCH | Mumbai | Mortal remains of veteran industrialist Ratan N Tata kept at NCPA lawns for the public to pay their last respects pic.twitter.com/9YlcsHgo1u

    — ANI (@ANI) October 10, 2024

  • 10 Oct 2024 09:54 AM (IST)

    10 Oct 2024 09:54 AM (IST)

    मुंबई पोलिसांच्या बॅन्ड पथकाकडून मानवंदना

    उद्योगरत्न रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज दुखवटा पाळला जाणार आहे. सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. सध्या त्यांचे पार्थिव राहत्या कोलाबा येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर पद्मविभूषण रतन टाटा यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या मुंबईमध्ये त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या बॅन्ड पथकाने रतन टाटा यांना मानवंदना दिली आहे.

    #WATCH | Mumbai | Mortal remains of Ratan Tata, draped in the national flag, kept at NCPA lawns for the public to pay last respects

    The last rites will be held at Worli crematorium after 4pm today pic.twitter.com/hRdnIrytEl

    — ANI (@ANI) October 10, 2024

Web Title: Ratan tata death live updates age funeral last right prayer time twitter reaction all latest updates today at worli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 09:47 AM

Topics:  

  • Ratan Tata
  • Ratan Tata Death

संबंधित बातम्या

“त्यांना परमेश्वराने अमरत्व द्यावं…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं रतन टाटा आणि बाबा आमटेंविषयी मत
1

“त्यांना परमेश्वराने अमरत्व द्यावं…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं रतन टाटा आणि बाबा आमटेंविषयी मत

Ratan Tata Will: रतन टाटांचे 3,800 कोटी रुपये; सर्वाधिक वाटा धर्मादाय संस्थेला, कोणाला काय मिळेल?
2

Ratan Tata Will: रतन टाटांचे 3,800 कोटी रुपये; सर्वाधिक वाटा धर्मादाय संस्थेला, कोणाला काय मिळेल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.