Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratan tata death live updates: रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा, राजकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार

Ratan Tata death news updates: रतन टाटा यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. सर्व नेते, अभिनेते, अभिनेत्री यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे राज्य सरकारचे मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 10, 2024 | 08:33 AM
Ratan tata death live updates: रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा, राजकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार

Ratan tata death live updates: रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा, राजकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार

Follow Us
Close
Follow Us:

Ratan Tata death news live updates: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. टाटा समूहाने ही माहिती दिली आहे. रतन टाटा यांच्या निधनाबद्दल टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, आम्ही रतन नवल टाटा यांना निरोप देत आहोत हे अत्यंत दु:खद आहे. ते खरोखरच एक असाधारण नेते होते, ज्यांच्या अतुलनीय योगदानाने केवळ टाटा समूहच नव्हे तर देशालाही आकार दिला आहे. रतन टाटा यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. सर्व नेते, अभिनेते, अभिनेत्री यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

हेदेखील वाचा- Ratan Tata Death Live Updates : रतन टाटांच्या कोट्यवधींच्या संपत्तीचा वारसदार नेमका कोण असणार? ‘ही’ नावं सध्या चर्चेत…

रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतात मोठी शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना काल रुग्णालायत दाखल करण्यात आली होते. मात्र रात्री उशीरा त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झूंज अयशस्वी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. उद्योगपती रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात आज दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

रतन टाटा यांना आज राज्य सन्मानाने निरोप देण्यात येणार आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव रुग्णालयातून त्यांच्या घरी नेण्यात आले. आज सकाळी 10 वाजल्यापासून लोकांना मुंबईत त्यांचे अंतिम दर्शन घेता येणार आहे. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याबाबतच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. तर रतन टाटा यांचे पार्थिव सकाळी 10 ते दुपारी 3:30 या वेळेत दर्शनासाठी दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या सभागृहात येथे ठेवण्यात येणार आहे. याबाबत मुंबई पोलिसांचे दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख यांनी माहिती दिली आहे.

हेदेखील वाचा- उद्योगपती रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा; सर्व शासकीय कार्यक्रम रद्द

अभिनव देशमुख यांनी सांगितले की, रतन टाटा यांचे पार्थिव सकाळी 10 ते दुपारी 3:30 या वेळेत दर्शनासाठी एनसीपीए येथे ठेवण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या सर्वांना आवाहन आहे की, तेथे पार्किंगची सुविधा नसल्यास त्यांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि येण्यापूर्वी त्यांची पार्किंग व्यवस्था तपासावी. या ठिकाणी पोलिसांचा पूर्ण बंदोबस्त तैनात असेल. रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.

रतन टाटा यांच्या निधनाच्या दु:खद बातमीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएल टाटा यांच्याशी संवाद साधला आहे. नोएल हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. तसेच रतन टाटा यांच्या निधनानंतर झारखंड सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विटरवरील आपल्या शोकसंदेशात लिहिले आहे की, झारखंडसारख्या देशाच्या मागासलेल्या राज्याला ओळख देणारे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि पदविभूषण रतन टाटा यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर करण्यात आला आहे.

Web Title: Ratan tata death live updates age funeral last right prayer time twitter reaction all latest updates today ratan tata funeral will be held with political honours in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 08:30 AM

Topics:  

  • Ratan Tata
  • Ratan Tata Death

संबंधित बातम्या

“त्यांना परमेश्वराने अमरत्व द्यावं…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं रतन टाटा आणि बाबा आमटेंविषयी मत
1

“त्यांना परमेश्वराने अमरत्व द्यावं…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं रतन टाटा आणि बाबा आमटेंविषयी मत

Ratan Tata Will: रतन टाटांचे 3,800 कोटी रुपये; सर्वाधिक वाटा धर्मादाय संस्थेला, कोणाला काय मिळेल?
2

Ratan Tata Will: रतन टाटांचे 3,800 कोटी रुपये; सर्वाधिक वाटा धर्मादाय संस्थेला, कोणाला काय मिळेल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.