मुंबई : जर तुमचेही कोणत्याही बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी आहे ही महत्त्वाची बातमी. आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सर्व बँकांसाठी सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे आता सर्व बँकांच्या कामाच्या पद्धती बदलणार आहे.
हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींवर आधारित धोरण तयार करायचे आहे. यासाठी केंद्रीय बँक जागतिक संस्था आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचांच्या अनुभवाचा फायदा घेत आहे. सर्व रिझव्र्ह बँक विनियमित घटकांसाठी (आरई) सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील, असे रिझव्र्ह बँकेने ‘क्लायमेट रिस्क अँड सस्टेनेबल फायनान्स’ या विषयावरील चर्चापत्रात म्हटले आहे.
“आरई बँकिंग प्रक्रिया अधिक पर्यावरणपूरक बनवून त्यांच्या कामकाजात कागदाचा वापर बंद करून बँकांचे ब्रँचेस ग्रीन ब्रँचमध्ये रूपांतरित करण्याचा विचार करू शकते,” असे त्यात म्हटले आहे.