Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Population: १६ वर्षांनी जनगणनेचा बिगुल! नागरिकांना ३३ प्रश्न विचारणार; माहिती राहणार गोपनीय

राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील असून यामध्ये केवळ घरगणना होत आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जातनिहाय जनगणना होईल.यावेळी जनगणनेत ३३ महत्त्वाचे प्रश्न नागरिकांना विचारले जाणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 12, 2026 | 12:24 PM
१६ वर्षांनी जनगणनेचा बिगुल! नागरिकांना ३३ प्रश्न विचारणार; माहिती राहणार गोपनीय (फोटो सौजन्य-Gemini)

१६ वर्षांनी जनगणनेचा बिगुल! नागरिकांना ३३ प्रश्न विचारणार; माहिती राहणार गोपनीय (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:

अमरावती: २०११ नंतर तब्बल १६ वर्षांनी भारताची जनगणना २०२७ मध्ये पुन्हा एकदा मार्गी लागणार असून कोरोना काळामुळे रखडलेली ही प्रक्रिया आता वेग घेत आहे. जिल्ह्यात १ एप्रिलपासून ४ हजारांहून अधिक प्रगणक घराघरांत जाऊन माहिती संकलित करतील. यावेळी जनगणनेत ३३ महत्त्वाचे प्रश्न नागरिकांना विचारले जाणार आहे व सर्व माहिती मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन नोंदवली जाईल. जनगणना प्रशिक्षण सोमवारपासून सुरू होत असून ते ३ दिवस चालणार आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत हाऊस लिस्टिंग ब्लॉक (एचएलबी) अंतर्गत कामे सुरू असून साधारणपणे ७०० ते ८०० लोकसंख्येचा एक एचएलबी राहणार आहे. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जनगणनेदरम्यान प्रगणक नागरिकांना घराची रचना, सुविधा, कुटुंबाची रचना, शिक्षण, संपर्क सुविधा यासह विविध सामाजिक-आर्थिक बाबींवर प्रश्न विचारणार आहेत. सर्व माहिती थेट मोबाइलमधील प्रगणकाच्या अल्पमध्ये नोंदवली जाईल. या सर्व प्रक्रियेतर प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी तसेच जिल्हा जगनगणना अधिकारी तथा आरडीसी यांचे नियंत्रण राहील. माहिती घरसूची व गृहगणना अनुसूचीद्वारे गोळा केली जाईल, जनगणनेतील सर्व माहिती गोपनीय राहणार आहे. भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी २२ जानेवारीला अधिसूवना जारी केली. त्यानुसार, जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत नियुक्त प्रगणक घराघरांत जाऊन माहिती संकलित करतील.

 घरगुती सिलिंडरच्याही तुटवड्याची शक्यता, दरवाढीचा अमरावतीला झटका; ५.९५ लाख ग्राहकांवर परिणाम

जनगणनेत पहिल्यांदा जातनिहाय नोंद

या जनगणनेतील सर्वात महत्त्वाचा व चर्चेचा मुद्दा म्हणजे पहिल्यांदाच जातनिहाय नोंदीचा आहे. कुटुंबप्रमुख अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किवा इतर प्रवर्गातील आहे का, याची अधिकृत नोंद केली जाणार आहे. यामुळे भविष्यातील धोरणे, विकास आराखडे आणि शासकीय योजनांचे नियोजन अधिक अचूक होण्यास मदत होणार आहे.

विवाहित जोडप्यांची संख्या किती?

प्रगणकांद्वारे घरातील खोल्यांची संख्या, विवाहित जोडप्यांची संख्या, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत व उपलब्धता, प्रकाशाचा स्रोत, शौचालय व स्नानगृहाची उपलब्धता, सांडपाणी निचरा व्यवस्था, स्वयंपाकघर व एलपीजी/पीएनजी कनेक्शन, तसेच स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन याचीदेखील माहिती घेतली जाणार आहे.

तहसीलदार, सीओ करतील प्रगणक नियुक्त

जिल्ह्यात १ एप्रिलपासून जनगणना सुरू होईल. त्यापूर्वी संबंधित तहसीलदार व सीओ तालुक्यातील प्रगणकांची नियुक्ती करतील, प्रगणक हे शासकीय व निमशाकीय कर्मचारी राहणार आहे. यासाठी त्यांना मानधन मिळेल.

आधुनिक सुविधांचीही घेणार माहिती

जनगणनेत रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, लॅपटॉप किंवा संगणक, दूरध्वनी, मोबाइल व स्मार्टफोनची उपलब्धता, तसेच सायकल, दुचाकी, चारचाकी वाहनांची माहिती नोंदवली जाणार आहे. कुटुंबात वापरले जाणारे मुख्य धान्य आणि जनगणनेशी संबंधित संवादासाठी मोबाइल क्रमांकही विचारला जाईल. जनगणनेच्या नोंदीसाठी प्रगणकांना त्यांच्या मोबाइलमध्ये संबंधित अप डाऊनलोड करावे लागेल व हे अॅप जीपीएसबेस राहणार आहे.

घराचा प्रकार, वापर, मालकीची नोंद

प्रगणक घराचा क्रमांक, जनगणना घराचा क्रमांक, घराच्या फरशी, भिंती व छतासाठी वापरलेले साहित्य, घराचा वापर व स्थिती याबाबत माहिती घेतील. कुटुंबाचा क्रमांक, कुटुंबातील एकूण सदस्यसंख्या, कुटुंबप्रमुखाचे नाव व लिंग, सामाजिक प्रवर्ग, तसेच घराची मालकी स्थितीची नोंद होणार असल्याचे प्रशासनाच्या एका अधिकार्यांनी सांगितले.

Amravati News : पूर्णा नदी पात्रात पोकलेनचा ‘धुमाकूळ’, प्रशासनावर प्रश्नचिन्ह; रेतीचा बेकायदेशीर उपसा सुरुच

 

Web Title: The census bugle after 16 years 33 questions will be asked information will remain confidential

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • amravati
  • Census
  • india

संबंधित बातम्या

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
1

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
2

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

India caste census: जात मोजणार, पण नेमकी कशी? जनगणना २०२७ मधील जातनिहाय आकडेवारीवरून का वाद?
3

India caste census: जात मोजणार, पण नेमकी कशी? जनगणना २०२७ मधील जातनिहाय आकडेवारीवरून का वाद?

Yash Toxic Movie: ‘टॉक्सिक’साठी यशला कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन गेल्या गीतू मोहनदास; म्हणाला, “मला एक अ‍ॅक्टर म्हणून पुश केलं”
4

Yash Toxic Movie: ‘टॉक्सिक’साठी यशला कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन गेल्या गीतू मोहनदास; म्हणाला, “मला एक अ‍ॅक्टर म्हणून पुश केलं”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.