Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जाचा हप्ता, EMI वाढणार की कमी होणार? पाहा आरबीआयचा नवीन रेपो दर

RBI keeps repo rate unchanged: तुमच्या कर्जाचा हप्ता किंवा ईएमआय वाढणार की कमी होणार? नुकतचं आरबीआरकडून नवीन रेपो रेट जाहीर करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 07, 2024 | 11:26 AM
जीडीपी चमकत असताना महागाई घसरली!  रेपो दरात आज बदल होणार का?

जीडीपी चमकत असताना महागाई घसरली!  रेपो दरात आज बदल होणार का?

Follow Us
Follow Us:

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI Bank) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण धोरण समितीने (MPC) रेपो दर न बदलण्याचा निर्णय घेतला. म्हणजे रेपो दर हा 6.50 टक्क्यांवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण किरकोळ महागाईचे प्रमाण हे 4 टक्क्यांच्या निर्धारित लक्ष्यापेक्षा जास्त आहे. यापूर्वी, या आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या एमपीसी बैठकीत, धोरण दर स्थिर ठेवण्यात आले होते. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी मुंबईत सुरू झालेल्या बैठकीचे निकाल जाहीर केले. रेपो दर स्थिर असल्याने कर्जाचा हप्ता आणि ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही. मात्र, मध्यवर्ती बँकेने जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे. त्यात 20 बेसिस पॉइंट्सने 7 टक्क्यांवरून 7.20 टक्के वाढ केली आहे.

5 जूनपासून आरबीआयच्या पतधोरण समितची बैठक सुरु होती. ही बैठक तीन दिवसीय बैठक 7 जून ला संपली. या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास रेपो रेटबाबत महत्त्वाची घोषणा केली असून, सध्याचा रेपो रेट हा 6.50 टक्के म्हणजे गेल्या आठ महिन्यांपासून जैसे थे रेट असल्याचे पाहायला मिळत आहे.

फेब्रुवारी 2023 पासून रेपोचे दर जैसे थे

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या मते, MPC मधील सहा सदस्यांपैकी 4 सदस्य रेपो दरातील कोणत्याही बदलाच्या बाजूने नव्हते. नवीन आर्थिक वर्षातील एमपीसीची ही दुसरी बैठक असून सध्या रेपो दर 6.50 टक्क्यांवर स्थिर आहे. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2023 मध्ये अखेरचा व्याजदर बदलला आणि तो 25 आधार अंकांनी वाढवून 6.50 टक्के केला. तेव्हापासून त्यात बदल करण्यात आलेला नाही.

शुक्रवारी निकाल जाहीर करताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, मे महिन्यात एमपीसीच्या बैठकीत रेपो दर 6.50% राखण्याबरोबरच रिव्हर्स रेपो दर 3.35%, स्थायी ठेव सुविधा दर 6.25 वर ठेवला गेला. तर मार्जिनल किरकोळ स्थायी सुविधा दर 6.75% आणि बँक दर 6.75% ठेवण्यात आला आहे. उल्लेखनीय आहे की लोकसभा निवडणूक निकाल २०२४ नंतर आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची ही पहिलीच बैठक होती.

महागाई दराचा अंदाज

सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार, किरकोळ महागाईत घट झाली आहे. मात्र, अन्नधान्याच्या चलनवाढीमुळे घाऊक महागाईचा दर मंदावला आहे. अशा स्थितीत रिझर्व्ह बँकेने महागाई दराचा अंदाज ४.५ टक्के कायम ठेवला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, केंद्रीय बँक महागाई दर 4 टक्क्यांच्या लक्ष्यानुसार आणण्यासाठी कटिबद्ध आहे.

EMI वर रेपो रेट

RBI ची MPC बैठक दर दोन महिन्यांनी घेतली जाते आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्यासह सहा सदस्य महागाई आणि इतर समस्या आणि बदल (नियम बदल) यावर चर्चा करतात. रेपो रेटचा थेट संबंध बँक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांशी असतो. ते कमी झाल्यामुळे कर्जाचा ईएमआय कमी होतो आणि वाढल्यामुळे कर्ज ही वाढते. वास्तविक, रेपो रेट हा दर आहे ज्यावर देशाची मध्यवर्ती बँक निधीची कमतरता असल्यास व्यावसायिक बँकांना कर्ज देते. चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी रेपो रेटचा वापर चलन प्राधिकरणांकडून केला जातो.

महागाईवर रेपो दर काय परिणाम

मे महिन्याच्या महागाई दराचे आकडे या महिन्याच्या शेवटी जाहीर केले जातील. एसबीआय संशोधनानुसार, ऑक्टोबर ते आर्थिक वर्ष 2024-25 अखेरपर्यंत महागाईचा दर 5 टक्क्यांच्या खाली राहण्याची अपेक्षा आहे. याआधी, एप्रिल महिन्यात घाऊक महागाई 1.26% पर्यंत वाढली आहे, जी 13 महिन्यांची उच्च पातळी आहे. याशिवाय एप्रिलमध्ये किरकोळ महागाई 4.83 टक्के होती. (फोटो सौजन्य- इंडिया टुडे)

Web Title: Rbi keeps repo rate unchanged at 6 5 percentage for 8th time in row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2024 | 11:24 AM

Topics:  

  • RBI
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

October Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये अर्धा महिना बँका बंद राहणार? कामाचं नियोजन करण्यापूर्वी तपासा सुट्ट्यांचे कॅलेंडर
1

October Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये अर्धा महिना बँका बंद राहणार? कामाचं नियोजन करण्यापूर्वी तपासा सुट्ट्यांचे कॅलेंडर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.