
गेल्या 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले आहेत. 12 नोव्हेंबरपासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. या मजुरांच्या सुटकेसाठी बोगद्यात 800 मिमी व्यासाची पाईप सोडण्यात आली. या पाईपमधून NDRF ची टीम मजुरांपर्यंत पोहोचली.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी इथं बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर आज सुटका होत आहे. NDRF च्या रेस्क्यू ऑपरेशनचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. गेल्या 12 नोव्हेंबरपासून म्हणजेच 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले होते. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात (41 कामगार अडकल्याने देशासह जगाच्या नजरा या रेस्क्यू ऑपरेशनकडे लागल्या. 41 मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येईल. त्यासाठी रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. 41 मजुरांसाठी 41 बेड तयार करण्यात आले.
या मजुरांच्या सुटकेसाठी बोगद्यात 800 मिमी व्यासाची पाईप सोडण्यात आली. या पाईपमधून NDRF ची टीम मजुरांपर्यंत पोहोचली. या पाईपद्वारेच मजुरांच्या सुटकेचे प्रयत्न करण्यात आले.
दिवाळीपासून बोगद्यात अडकून
उत्तरकाशी टनेल रेस्क्यू ऑपरेशन मागील 16 दिवसांपासून सुरु आहे. देशभरात दिवाळी सुर असताना दिवाळीच्या पहिल्या दिवशी माती कोसळून 41 मजूर बोगद्यामध्ये अडकले. तेव्हापासून म्हणजे 12 नोव्हेंबरपासून हे बचावकार्य सुरु आहे. आज या बचावकार्याचा 17 वा दिवस आहे.
बोगदा नेमका कशासाठी?
उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून 30 किमी अंतरावर बोगद्याचं काम सुरु आहे. केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी चारधाम ऑल वेदर सडक सिल्कियारा ही योजना सुरु आहे. या प्रकल्पामुळे कोणत्याही ऋतुमध्ये, कोणत्याही वातावरणात रस्ते वाहतूक करता येणार आहे. ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय राज्यमार्गावरील या बोगद्याचं काम सुरु आहे. हा बोगदा 4.5 किमी लांब आहे.