Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदींच्या शपथविधीसाठी कोण कोण येणार? सफाई कामगार, तृतीयपंथी अन् रेल्वे कर्मचाऱ्यांनाही आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. त्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 07, 2024 | 12:22 PM
मोदींच्या शपथविधीसाठी कोण कोण येणार? सफाई कामगार, तृतीयपंथी अन् रेल्वे कर्मचाऱ्यांनाही आमंत्रण
Follow Us
Follow Us:

दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान पदी शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी देखील एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाच्या 16 जागा तर नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) या पक्षाच्या 12 जागा आहेत. त्यांच्या साथीने देशामध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन केले जाणार आहे. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी येत्या 9 रोजी होणार असून सायंकाळी 6 वाजता होणार आहे. यावेळी देशातील अनेक मान्यवर तसेच पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

कोणा कोणाला आमंत्रण

येत्या रविवारी 9 जून रोजी राष्ट्रपती भवन येथे नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्या आले आहे. राष्ट्रपती भवनात ८००० पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, या सोहळ्याला दक्षिण आशियाई देशातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्पा कमल दहल प्रचंड, भुटानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि मॉरिशसनचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथही यांची देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर देशातील मान्य़वर उपस्थित राहणार आहेत. शपथविधीसाठी सफाई कर्मचारी, तृतीयपंथी आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांची उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते. तसेच पहिल्या वंद भारत महिला लोको पालयट सुरेखा यादव,  वंदे भारत आणि मेट्रो प्रकल्पासाठी काम करणारे रेल्वे कर्मचारी, केंद्रीय योजनांचे लाभार्थी आणि ‘विकसित भारत’ कार्यक्रमाचे ॲम्बेसेडर यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले जाणार आहे.

यापूर्वी कोण राहिले होते उपस्थित

नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा शपथविधी सोहळा आहे. यापूर्वी 2014 साली नरेंद्र मोदी यांचा पहिला शपथविधी सोहळा पार पडला होता. यावेळी सार्क (South Asian Association for Regional Cooperation) परिषदेच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यानंतर 2019 साली झालेल्या दुसऱ्या शपथविधीवेळी बिमस्टेक (Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation) देशांच्या प्रतिनिधींनी शपथविधीचे निमंत्रण स्वीकारले होते. त्यानंतर आता तिसरा सोहळ्याकडे संपूर्ण देशासह जगभराचे लक्ष लागले आहे.

Web Title: Sanitation workers transgenders to be invited to pm narendra modi oath ceremony at delhi nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2024 | 12:10 PM

Topics:  

  • loksabha elections 2024
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Modi: ‘मोदी म्हणजे विष्णूचा अवतार…’, भूतानच्या पंतप्रधानांचे आश्चर्यकारक विधान; भारताचा गौरव करून दिले मोठ्या भावाचे स्थान
1

PM Modi: ‘मोदी म्हणजे विष्णूचा अवतार…’, भूतानच्या पंतप्रधानांचे आश्चर्यकारक विधान; भारताचा गौरव करून दिले मोठ्या भावाचे स्थान

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं
2

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं

Global South: ग्लोबल साउथमधील मैत्रीचा नवा अध्याय; भारत-घाना यांच्यात कृषी व वैज्ञानिक संशोधनासह विविध क्षेत्रांत ऐतिहासिक करार
3

Global South: ग्लोबल साउथमधील मैत्रीचा नवा अध्याय; भारत-घाना यांच्यात कृषी व वैज्ञानिक संशोधनासह विविध क्षेत्रांत ऐतिहासिक करार

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
4

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.