हरयाणा सरकारी विभागांत तब्बल ७०० कोटींचा घोटाळा (File Photo)
सीबीआयच्या आरोपानुसार, भांडी व्यापारी गौरव कांसल याने सरकारी खात्यांतून काढलेली रक्कम रोखीत रूपांतरित करून पुन्हा बँक खात्यांत जमा करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावली. आयडीएफसी बँकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक आणि कथित सूत्रधार रिभव ऋषी याच्यासोबत मिळून त्याने दोन वर्षांत ९४ कोटी रुपये वळवले. सरकारी निधीचा स्रोत लपवण्यासाठी अनेक बँक खात्यांतून व्यवहार केल्याचा आरोप आहे.
२० जानेवारी २०२६ रोजी कालका नगर परिषदेच्या खात्यातून १८.४६ कोटी रुपये काढण्यात आल्याचा आरोप आहे. यातील २ कोटी रुपये रोखीत जमवून त्याच दिवशी हवाला मार्गाने दिल्लीत आरोपी आयएएस अधिकारी आर. के. सिंह यांच्या मुलापर्यंत पोहोचवल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
दरम्यान, चंडीगड मेगा स्टोअरचा मालक मोहित गोयल याच्या आणि त्याच्या भगवती एजन्सीज या कंपनीच्या खात्यांत चार कंपन्यांनी ११ ऑक्टोबर २०२३ ते २८ जानेवारी २०२६ या काळात ११२ व्यवहारांतून ५९.५० कोटी रुपये पाठवले. त्याबदल्यात केवळ १४.०५ कोटी रुपये परत पाठवण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
बनावट कंपन्यांच्या माध्यमातून निधी वळवला
बनावट कंपन्यांच्या माध्यमातून सरकारी निधी वळवून रोखीत रूपांतरित केल्याचा आरोप असून, रक्कम कोणापर्यंत पोहोचली आणि त्यातून कुठे मालमत्ता खरेदी झाली, याचा तपास सुरू आहे.
बाळूमामा देवस्थानातील 60.75 कोटींचा गैरव्यवहार उघड
अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीचा मुद्दा तापला असतानाच आता महाराष्ट्रातील एका मंदिरातील आर्थिक घोटाळ्याचे प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथील श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान समितीमध्ये तब्बल 60 कोटी 75 लाख 28 हजार रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणी उपनिबंधक रागिणी खडके यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.






