Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा एकदा रेल्वे अपघात! सिकंदराबाद-शालीमार एक्सप्रेसचे डब्बे रुळावरून घसरले

पुन्हा एकदा रेल्वे अपघात झाला आहे. सिकंदराबादहून शालिमारकडे येणाऱ्या शालीमार गाडी अपघात झाला असून यामध्ये रेल्वेचे डबे रुळावरून घसरले. पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 09, 2024 | 11:34 AM
Secunderabad Shalimar superfast train accident in West Bengal marathi news

Secunderabad Shalimar superfast train accident in West Bengal marathi news

Follow Us
Close
Follow Us:

कोलकाता : देशाचे रेल्वे अपघाताचे सत्र वाढले आहे. मागील काही महिन्यांमध्ये रेल्वे अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आता पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा रेल्वे अपघात झाला आहे. कोलकात्याच्या हावडामधील नालपूरजवळ  ट्रेनचा अपघात झाला आहे. सिकंदराबादहून शालिमारकडे येणाऱ्या शालीमार गाडी अपघात झाला असून यामध्ये रेल्वेचे डबे रुळावरून घसरले. ही घटना आज (दि.09) पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली.

सिकंदराबाद-शालीमार एक्सप्रेसचा नालपूर येथे हा अपघात झाले. या अपघातामध्ये गाडीचे 3 डबे रुळावरुन घसरले. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या अपघातामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली माहिती समोर आलेली नाही. रेल्वे रुळावर घसरल्याची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या अपघातामध्ये एक पार्सल बोगी आणि दोन प्रवासी बोगी रुळावरून घसरली असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सांस लेता हूं और एक नया #TrainAccident हो जाता है

मतलब देश में अधिकांश सामान्य लोग जिस परिवहन का प्रयोग करते हैं वह सबसे असुरक्षित है, नहीं पता कब क्या घटना हो जाये।

दरअसल खबर कोलकाता से है जहां हावड़ा के नजदीक सिकंदराबाद – शालीमार एक्सप्रेस ट्रेन के 3 डब्बे पटरी से उतर गईं। pic.twitter.com/xGRsooqGba

— Priyanshu Kumar (@priyanshu__63) November 9, 2024

हे देखील वाचा : अजित पवार अन् प्रकाश आंबेडकर यांची भेट! राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण

मीडिया रिपोर्टनुसार, ट्रेन क्रमांक 22850 शालीमार मेल एक्सप्रेस ही साप्ताहिक विशेष ट्रेन आहे. हावडा-खड़गपूर रेल्वे मार्गावर हा अपघात झाला, तिथे अचानक ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले. ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत होते. रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन सेवा दल घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. सर्व बाधित प्रवाशांना हळूहळू बाहेर काढले जात आहे. अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर घटनास्थळीच प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.

हे देखील वाचा : CJI DY Chandrachud : कुणाला दुखावलं असेल तर माफ करा; निरोपाच्या भाषणात CJI डीवाय चंद्रचूड भावूक

दक्षिण पूर्व रेल्वेचे सीपीआरओ ओम प्रकाश चरण यांनी या अपघाताबाबत बोलताना म्हटले की,  आज पहाटे 5.31 वाजता सिकंदराबाद-शालीमार एक्स्प्रेस नालपूर स्टेशनवर मिडल लाईनवरून डाउन लाईनकडे जात असताना रुळावरुन घसरली. या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. आता प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पाठवण्यासाठी 10 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पाठवल्यानंतर सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. रेल्वे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विरोधकांसह प्रवाशांकडून रोष व्यक्त केला जात आहे. रेल्वे रुळावरुन गाडी घसरल्याची ही पुन्हा एकदा घटना घडली आहे. आता हावडा रेल्वे स्थानकापासून 20 किलोमीटरवर हा अपघात झाला.

Web Title: Secunderabad shalimar superfast train accident near nalpur howrah west bengal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 11:34 AM

Topics:  

  • Train Accident NEws

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.