‘इंडियाज लास्ट टी शॉप’ या चहाच्या दुकानाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या. हे दुकान समुद्रसपाटीपासून सुमारे १०,५०० फूट उंचीवर वसलेल्या गावात आहे आणि विशेष म्हणजे येथे डिजिटल पेमेंटची सुविधाही उपलब्ध आहे. म्हणजेच इतक्या उंचीवर बसूनही तुम्ही चहाचे घोट घेऊ शकता आणि UPI द्वारे पैसे भरू शकता. हे पाहून देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे.. ‘जय हो.’
देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ट्विटरवर त्यांनी केलेल्या पोस्ट्स युजर्सना खूप आवडतात. त्यांचे एक नवीन ट्विट वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ‘इंडियाज लास्ट टी शॉप’ चहाच्या दुकानात UPI पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे.
३ नोव्हेंबर रोजी एका ट्विटर वापरकर्त्याने उत्तराखंडमधील सुमारे १०,५०० फूट उंचीवर असलेल्या एका गावात चहाच्या दुकानाची छायाचित्रे शेअर केली होती. या चहाच्या दुकानावर ‘इंडियाज लास्ट टी शॉप’ असे लिहिलेले दिसते.
UPI पेमेंट तेही अगदी हजारो फूटवर
भारतातील या चहाच्या दुकानात दिसणारी सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याच्या काउंटरवर UPI बारकोड ठेवलेला आहे. म्हणजेच इतक्या उंचीवरही तुम्ही डिजिटल पेमेंट करू शकता. डिजिटल इंडियाचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
फोटोमध्ये या गावाचा उल्लेख करत ‘मनिफद्रपुरी (माना), बियास गुंफा श्री बद्रीनाथ’ असे लिहिले आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा देखील या दुकानातील UPI पेमेंट सुविधा पाहून स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि त्यांनी ही छायाचित्रे त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केली.
काय म्हणाले आनंद महिंद्रा
भारतातील या शेवटच्या चहाच्या दुकानाची छायाचित्रे शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, ‘ असे म्हणतात कि, एक चित्र हजार शब्द बोलतात. हे चित्र भारताच्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टमची व्याप्ती दाखवते, जय हो! महिंद्राच्या चेअरमनचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर ट्विटर यूजर्स सतत प्रतिक्रिया देत आहेत.
ट्विटरवर ९८ दशलक्ष फॉलोअर्स
आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि दररोज काहीतरी व्हायरल होत असतात. प्रत्येक पोस्टप्रमाणेच त्याची ताजी पोस्टही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आनंद महिंद्रा यांचे ट्विटरवर ९८ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.