Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलेक्शन चिन्ह बदलले तरीही लोक त्यांचा निर्णय बदल नाहीत : शरद पवारांचे सूचक वक्तव्य

  • By युवराज भगत
Updated On: Oct 05, 2023 | 06:20 PM
इलेक्शन चिन्ह बदलले तरीही लोक त्यांचा निर्णय बदल नाहीत : शरद पवारांचे सूचक वक्तव्य
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : राष्ट्रवादीची लढाई आता निवडणूक आयोगाच्या दारात पोहचल्याने राष्ट्रवादी कोणाची हा निर्णय आता लवकरच लागणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीबाबत भाष्य केलं. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. त्यामुळे निर्णय आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

माझी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड

माझी अध्यक्षपदाची निवड झाली होती. ती प्रोसेस मी सांगितली होती. माझ्या अध्यक्षपदाच्या प्रस्तावावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता हे लोक म्हणत आहेत माझी निवड चुकीची आहे. कायद्याने सगळं होईल. चुकीच्या मार्गाने कोणी काही करण्याचा प्रयत्न केला तरी काळजीचं कारण नाही. काही चिंता करण्याची गरज नाही. निकाल आपल्याच बाजूने लागेल, असं पवार म्हणाले.
काँग्रेसवेळी पण असंच झालं होतं. दोन गट पडले होते. निवडणुकीवेळी मतदारांनी जे करायचं ते केलं. निवडणूक चिन्ह बदललं तरी लोक आपला निर्णय बदलत नाहीत. मी 5 निवडणुका 5 चिन्हावर लढल्या आणि 5 वेळी जिंकून आलो, असं पवार म्हणाले.

5 चिन्हावर मी वेगवेगळ्या वेळी लढलो

दोन बैल, चरखा, गाय वासरू, हात, घड्याळ या 5 चिन्हावर मी वेगवेगळ्या वेळी निवडून आलो. निवडणूक चिन्ह काढून घ्यायची काही लोकांची रणनीती असू शकते, पण चिंता करण्याची गरज नाही. देशाचे वातावरण बदलत आहे. सरकार पाडून भाजपने सत्ता मिळवली आहे. त्यामुळे लोकांना याची जाणीव असल्याचं पवार म्हणाले.

देशातील तपास यंत्रणांचा गैरवापर

आज एजन्सी कडून काही लोकांना त्रास दिला जातोय. गावा गावात ed, cbi बद्दल चर्चा आहे. या यंत्रणा चुकीच्या इशाऱ्यावर काम करत आहेत.आपच्या राज्यसभा सदस्याच्या घरावर सकाळी 7 पासून छापे टाकले आणि रात्री त्यांना अटक केलं. आज तमिळनाडूत सकाळपासून DMK च्या नेत्यांच्या घरावर छापे टाकले जात आहे, असं पवार म्हणाले.
पश्चिम बंगाल मध्येही छापेमारी सुरू आहे. 13 महिने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये टाकलं. नंतर काही सिद्ध झालं नाही. शिवसेना नेता संजय राऊत यांना जेलमध्ये टाकलं. का तर ते भाजप विरोधात लिहीत बोलत होते. दहा वर्षांपूर्वी देखील ईडी संस्था होती. पण, अशी संस्था असल्याचं अनेकांना माहिती नव्हतं. संस्थेचा चुकीचा वापर केला जात आहे, असं पवार म्हणाले

Web Title: Sharad pawars suggestive statement they say people dont change their decision even if the election symbol changes nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2023 | 04:00 PM

Topics:  

  • NCP Chief Sharad Pawar

संबंधित बातम्या

राज अन् उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात शरद पवार जाणार नाहीत; कारण…
1

राज अन् उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात शरद पवार जाणार नाहीत; कारण…

शक्तिपीठ महामार्गाबाबत शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले; सरकारची…
2

शक्तिपीठ महामार्गाबाबत शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले; सरकारची…

‘दादा’, ‘साहेब’ दोन दिशेला; ‘राष्ट्रवादी’च्या शक्तिप्रदर्शनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
3

‘दादा’, ‘साहेब’ दोन दिशेला; ‘राष्ट्रवादी’च्या शक्तिप्रदर्शनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच व्यासपीठावर; एकत्रिकरणाची चर्चा, पण…
4

दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच व्यासपीठावर; एकत्रिकरणाची चर्चा, पण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.