Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शोएब अख्तरने सांगितला किस्सा, ‘जेव्हा लता दीदी फोनवर बोलताना म्हणाली, मला आई म्हणा’

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याने २०१६ मध्ये लताजींसोबत झालेल्या फोन संभाषणाचा उल्लेख केला आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 08, 2022 | 12:56 PM
शोएब अख्तरने सांगितला किस्सा, ‘जेव्हा लता दीदी फोनवर बोलताना म्हणाली, मला आई म्हणा’
Follow Us
Close
Follow Us:

Lata Mangeshkar Death: सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी त्यांच्याशी संबंधित आठवणी शेअर करत आहेत. या यादीत पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरचेही नाव आहे, ज्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये शोएबने २०१६ मध्ये लताजींसोबत झालेल्या फोन संभाषणाचा उल्लेख केला आहे.

तो म्हणाला, “२०१६ मध्ये, जेव्हा मी भारतात काम करत होतो, तेव्हा मला लताजींशी फोनवर बोलण्याचा बहुमान मिळाला होता. मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी आपल्या मधुर आवाजात उत्तर दिलं. मी जेव्हा त्यांना लताजी हाक मारली तेव्हा त्या म्हणाल्या, मला आई म्हणा, तेव्हापासून मी त्यांना आई म्हणू लागलो.

शोएब पुढे म्हणाला, लताजींनी माझ्याशी त्यांच्या क्रिकेट प्रेमाविषयी सांगितले की, तिने माझे अनेक सामने पाहिले आहेत आणि मैदानावर सचिन तेंडुलकरसोबत खूप भांडतानाही पाहिले आहे. लता दीदी म्हणाल्या की, तू मला मैदानावर आक्रमक वाटतो. तो म्हणाला होता की, मी माझ्या रागासाठी प्रसिद्ध आहे.

जेव्हा मी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्या म्हणाल्या की आता त्यांचे नवरात्रीचे उपवास सुरू आहेत आणि त्यानंतर त्यांना हवं तेव्हा भेटता येईल. मात्र, दुर्दैवाने तो दिवस आला नाही. त्यांनी मला अनेक आशीर्वाद दिले.  त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण झाले आणि मी भारतात येऊ शकलो नाही.  त्यांना कधीही भेटू शकलो नाही, ज्याचा मला कायम खेद राहील.

लता दीदीेचं दीर्घ आजाराने ६ फेब्रुवारीला निधन झालं. लताजी ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी ८ दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले आणि एकापेक्षा जास्त गाण्यांना आवाज दिला. विनयशील व्यक्तिमत्व असलेल्या भारतरत्न लतादिदी यांचा स्वर म्हणजे भावना आणि संवेदनांचा अनोखा अविष्कार आहे. त्यांचं गाणं केवळ सप्तसुरांपर्यंत मर्यादित नव्हतं, तर एक तरल अलौकिक अनुभुती देणारं, जगणं समृद्ध करणारं असं स्वरामृत आहे. हे स्वरामृत प्राशन करून इथलं प्रत्येक मन संगीतमय झालं आहे.

Web Title: Shoaib akhtar tells the story when lata didi said on the phone call me mother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2022 | 12:56 PM

Topics:  

  • Lata Mangeshkar
  • Shoaib Akhtar

संबंधित बातम्या

Lata Mangeshkar: ३६ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड करणारी ठरली पहिली गायिका, आजही चाहते आठवणीत होतात भावुक
1

Lata Mangeshkar: ३६ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड करणारी ठरली पहिली गायिका, आजही चाहते आठवणीत होतात भावुक

IND vs PAK: ‘पाकिस्तानचा प्रशिक्षक झालो तर, स्टार…’, भारताकडून धोबीपछाड मिळाल्यानंतर शोएब अख्तरने बांधले हवेत बंगले 
2

IND vs PAK: ‘पाकिस्तानचा प्रशिक्षक झालो तर, स्टार…’, भारताकडून धोबीपछाड मिळाल्यानंतर शोएब अख्तरने बांधले हवेत बंगले 

Asia cup 2025 : ‘भारत आम्हाला पराभूत करण्यासाठी..’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी Shoaib Akhtar ने केला मोठा खुलासा  
3

Asia cup 2025 : ‘भारत आम्हाला पराभूत करण्यासाठी..’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी Shoaib Akhtar ने केला मोठा खुलासा  

PAK vs IND : ‘नॉन-स्ट्राइक एंडवर उभा तुमचा बाप..’, वीरेंद्र सेहवागची पाकिस्तानविरुद्ध अविस्मरणीय फलंदाजी 
4

PAK vs IND : ‘नॉन-स्ट्राइक एंडवर उभा तुमचा बाप..’, वीरेंद्र सेहवागची पाकिस्तानविरुद्ध अविस्मरणीय फलंदाजी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.