IND vs PAK: 'If I become Pakistan's coach, I will be a star...', Shoaib Akhtar built bungalows in the air after being beaten by India
Shoaib Akhtar’s big statement: आशिया कप २०२५ (Asia cup 2025) मध्ये सुपर ४ फेरीच्या सामन्यात २१ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला होता. भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानचा दुसऱ्यांना पराभव केला. यानंतर आता पाकिस्तानच्या खराब कामगिरीवर शोएब अख्तरने भाष्य केले आहे. यावेळी त्याने संघाच्या खराब कामगिरीबद्दल संघाच्या प्रशिक्षकावर निशाणा साधला आहे.
पाकिस्तानचा माजी स्टार वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने प्रशिक्षकाकडे कोणतीही रणनीती नसल्याचे म्हटले आहे. अख्तरने असे देखील म्हटले आहे की, जर त्याला पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले तर तो २० सदस्यांची निवड समिती तयार करून १२ ते २००० स्टार्सना रांगेत उभे करेल. अख्तरने एका पाकिस्तानी युट्यूब चॅनलडवर बोलताना पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक होण्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला की, “सर्वप्रथम, पीसीबी मला कधीही या कामाबाब विचारणार नाही, कारण मी काहीही झाले तरी योग्य ते काम करेन. मी असे म्हणत नाही की मला अधिकार द्या. मी टीमवर्कवर विश्वास ठेवणारा आहे. तसेच मी तर्कावर आणि एकत्र काम करण्यावर विश्वास ठेवतो. मला २० सदस्यांची निवड समिती हवी आहे. मी त्यांच्या सल्ल्याचे नेमके पालन करेन.”
शोयब अख्तर पुढे म्हणाला की, “पाकिस्तान क्रिकेटला बळकट करण्यासाठी, जर मला तीन वर्षे देण्यात आली आणि माझ्याकडे लगाम दिला गेला, तर मला खेळाडूंना आत्मविश्वास द्यावा लागणार आहे. ‘सॅम अय्यूब, बेटा जा आणि खेळा. अभिषेक शर्माकडे परवाना आहे, तर तूही खेळायला पाहिजे. ठीक आहे, जर तुला वगळले गेले तर तुला संघातून वगळण्यात येणार नाही. सॅम, बेटा, तुझ्याकडे संपूर्ण वर्ष आहे. मी बघेन की कामगिरी कशी परत येणार नाही ते. तो बिचारा सॅम अय्यूब घाबरला आहे.” असे शोयब म्हणाला.
हेही वाचा : Women’s ODI World Cup पूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका! ‘ही’ स्टार खेळाडू संघाबाहेर; हेदर ग्राहमची लागली लॉटरी
अख्तर इतक्यावरच थांबला नाही तर तो पुढे म्हणाला कि, “पीएसएल स्पर्धेमध्ये ते ठीक आहे की धावा होतात. पण प्रेशर सामन्यांमध्ये तुम्हाला फटका मारावाच लागतो. अभिषेककडे फटका मारण्याचा परवाना आहे, म्हणूनच तो फटका मारतो.” अख्तर पुढे म्हणाला की, “पण मी योग्य ते काम करेन. मी १२ ते २००० स्टार खेळाडूंना रांगेत उभे करेन.”