नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) नुकतेच परतलेले भारतीय अंतराळवीर आणि ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी (Shubhanshu Shukla) गुरुवारी दिल्लीत आपला अनुभव सांगितला. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्यासोबत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेचे अनुभव शेअर केले.
शुभांशू शुक्ला म्हणाले की, “हे केवळ माझे नाही, तर संपूर्ण देशाचे मिशन होते.” त्यांनी सांगितले की अंतराळातील अनुभव जमिनीवरील अनुभवापेक्षा खूप वेगळा असतो. तिथे राहून मिळालेले ज्ञान आणि माहिती अमूल्य आहे, जी भविष्यातील मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
“गेल्या एका वर्षात मी गोळा केलेली सर्व माहिती आपल्या गगनयान (Gaganyaan) आणि भारतीय अंतराळ स्थानक (Indian Space Station) यांसारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमांसाठी खूप मोलाची ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
शुक्ला यांनी शरीरावर होणाऱ्या बदलांविषयीही सांगितले. ते म्हणाले, “२० दिवस अंतराळात घालवल्यानंतर शरीर गुरुत्वाकर्षणात (Gravity) जगणे विसरते. अंतराळातून भारत अजूनही जगातील इतर देशांपेक्षा जास्त चांगला दिसतो.”
#WATCH | Delhi | On Axiom-4 mission, Group Captain Shubhanshu Shukla says, “… This mission has been extremely successful. We have been able to achieve all of our technical objectives… Execution of such a mission gives a lot of knowledge that cannot be measured or… pic.twitter.com/merj19Utk9
— ANI (@ANI) August 21, 2025
शुभांशू शुक्ला यांनी भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेची (Gaganyaan Mission) माहिती दिली. ही इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे, ज्या अंतर्गत २०२७ मध्ये भारतीय हवाई दलाचे तीन वैमानिक अंतराळात पाठवले जातील. या मोहिमेचा अंदाजित खर्च सुमारे २०,१९३ कोटी रुपये आहे.
गगनयान मोहिमेची वैशिष्ट्ये:
या अनुभवाबद्दल बोलताना शुभांशू शुक्ला यांनी भारत सरकार, इस्रो आणि सर्व संशोधकांचे आभार मानले. लवकरच भारत आपल्या स्वतःच्या कॅप्सूल आणि रॉकेटमधून माणसाला अंतराळात पाठवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.