गाझियाबाद : गेल्या काही दिवसापासून देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपुर्वी समृद्धी महामार्गावर बुलडाणा येथे ट्रॅवल्सचा अपघात होऊन 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानतंर मुंबई आग्रा मार्गावर धुळे येथेही अपघात झाला. आता गाझियाबादमध्येही अशीच घटना उघडकीस आली आहे. गाझियाबादच्या विजय नगर पोलीस स्टेशन हद्दीतील दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर ताज हायवेच्या फ्लायओव्हरवर स्कूल बस (School Bus) आणि टीयूव्ही कारची धडक (Ghaziabad Accident) झाली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर लहान मुलांसह दोन जण जखमी झाले. मुख्यमंत्री योगी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
[read_also content=”अमेरिकेला टक्कर देत भारत होणार दुसरी मोठी अर्थव्यवस्था, कोण असेल आघाडीवर? https://www.navarashtra.com/india/india-will-be-second-largest-economy-to-beat-with-america-nrps-430142.html”]
मिळालेल्या माहितीनुसार,उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. स्कूल बस आणि कारची धडक झाली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
शाळेच्या बसचा अपघात होण्यामागे अतिवेग हे कारण आहे. स्कूल बस एक्सप्रेसवे पण ते चुकीच्या दिशेने जात होते. कारमधील कुटुंब मेरठहून दिल्लीच्या दिशेने जात होते. हे कुटुंब खातू श्यामला भेटण्यासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृतांमध्ये कारचालक धर्मेंद्र यांची पत्नी बबिता (३८), नरेंद्रचा मुलगा हिमांशू (१२), नरेंद्रचा मुलगा करकित (१५), धर्मेंद्र यांची मुलगी वंशिका (७), नरेंद्रचा भाऊ धर्मेंद्र यादव (४२) आणि मुलगा आर्यन (८) हे गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब मेरठमधील इंचोलीच्या धनपूर गावचे रहिवासी होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाझियाबादमधील रस्ता अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो, अशी कामना करत मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना योग्य उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.