डेहराडूनमध्ये भीषण अपघात, कंटेनरची कारला धडक (फोटो सौजन्य-X)
उत्तराखंडची राजधानी असणाऱ्या डेहराडूनमध्ये सोमवारी (11 नोव्हेंबर) रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात एक जण जखमीही झाला आहे. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला असून याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.
डेहराडूनमधील कँट परिसरातील ओएनजीसी चौकाजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला. इनोव्हा कार आधी कंटेनरला धडकली त्यानंतर झाडाला धडकली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार किशननगर चौकातून होती. ओएनजीसी चौकात भरधाव कारने कंटेनरला धडक दिली. कारची धडक इतकी जोरदार होती की गाडीचा बोनेट कंटेनरच्या मागे अडकला. यानंतर कार चुकीच्या दिशेने 100 मीटर अंतरावर झाडावर आदळली. या अपघातात कारचे चक्काचूर झाले. कारमध्ये प्रवास करणाऱ्या सहा तरुण-तरुणींचा मृत्यू झाला. या अपघातात काही लोकांच्या मृतदेहाचे तुकडे झाले.
हे सुद्धा वाचा: राज्यावर दुहेरी संकट! आज किमान तापमान 12 अंशांवर, 3 दिवस पाऊस आणि थंडीचं सावट
या अपघातात ज्या तीन मुलींचा मृत्यू झाला त्यात गुनीत तेजप्रकाश सिंह(१९), नव्या पल्लव गोयल(२३) आणि कामाक्षी तुषार सिंघल(२०) यांचा समावेश आहे. या तीनही मुली डेहराडूनमधील विविध शहरात राहणाऱ्या होत्या. याशिवाय ज्या मुलांचा मृत्यू झाला आहे त्यांची नावे कुणाल कुकरेजा(२३), अतुल सुनील अग्रवाल(२४) आणि ऋषभ जैन(२४) अशी आहेत. यात कुणाल कुकरेजा हा हिमाचलच्या चंबा येथे राहाणारा होता. तर बाकी सगळे डेहराडून येथे राहाणारे होते.
याशिवाय जखमी झालेल्या तरुणाचे नाव सिद्धेश अग्रवाल S/O विपिन कुमार अग्रवाल (25) असे आहे. तो डेहराडूनच्या आशियाना शोरूम मधुबनसमोर राजपूर रोड येथील रहिवासी आहे. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार किशननगर चौकाकडून येत होती. कारचा वेग एवढा होता की धडकल्यानंतर गाडीचा बोनेट कंटेनरच्या मागे अडकला. कंटेनरला धडक दिल्यानंतर कार सुमारे 100 मीटर चुकीच्या दिशेने गेली आणि एका झाडाला धडकली. त्यामुळे कारचे छत एका बाजूने कोसळून कारचे तुकडे झाले.
गाडीत अडकलेल्या तरुणांची अवस्थाही पाहण्यासारखी नव्हती. अपघात आणि तरुणांची अवस्था पाहून रस्त्यावरून जाणारे लोकही हैराण झाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता वाहनात अडकलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसले. यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे सुद्धा वाचा: मोटारमनची सतर्कता, वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात टळला; बैलाच्या धडकेमुळे ट्रेनचा पुढचा भाग तुटला