नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) सोमवारपासून सुरू झाले आहे. यावेळी, विरोधकांनी (Opposition Party) सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी अग्निपथ योजना (Agnipath Scheme), महागाई (Inflation) आणि असंसदीय शब्दांची यादी यावरुन सरकारला घेरले. तर, स्मृती इराणी यांनी संसदेतील अनुपस्थितीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची हजेरी घेतली.
मंगळवारी विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज बुधवारी सकाळपर्यंत तहकूब करण्यात आले होते. आज पुन्हा अधिवेशन सुरु झाले असून सभागृहाच्या मंगळवारी दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी संसदेबाहेर निदर्शने केली होती. या निदर्शनात काँग्रेस नेते राहुल गांधीही (Rahul Gandhi) सहभागी झाले होते. याबाबत भाजपच्या नेत्या तथा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी राहुल गांधींना चांगलेच सुनावले.
Rahul Gandhi never posed a question,always disrespected Parliamentary proceedings…He’s the one to have less than 40% attendance in Parliament…Today, the person who’s been politically unproductive is dedicating himself to ensure there’s no debate in Parliament:Smriti Irani,BJP pic.twitter.com/FpA5pnL1zs
— ANI (@ANI) July 20, 2022
राहुल गांधी यांनी संसदेत कधीही प्रश्न विचारला नाही. नेहमीच संसदीय कामकाजाचा त्यांनी अपमान केला. त्यांची संसदेत उपस्थिती ४० टक्के पेक्षा कमी आहे. या व्यक्तीला संसदेत कोणतीही चर्चा नको, त्यासाठी स्वत:ला वाहून घेत आहेत, असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.