Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Belonging: A Journey of Love: इटलीतील बालपणापासून पंतप्रधानपदाच्या संधीपर्यंत; Sonia Gandhiनी शेअर केली आत्मचरित्राची पहिली झलक

Sonia Gandhi Belonging: A Journey of Love: या पुस्तकात गांधी घराण्यात परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रमुख शोकांतिकांचाही वृत्तांत आहे. यामध्ये संजय गांधी यांचा विमान अपघातातील मृत्यू, १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या आणि १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या यांचा समावेश आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 22, 2026 | 02:38 PM
Sonia Gandhi, Belonging A Journey Of Love,

Sonia Gandhi, Belonging A Journey Of Love,

Follow Us
Follow Us:
  • सोनिया गांधींच्या पहिल्या आत्मचरित्राची झलक
  • इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर
  • बालपणापासून राजीव गांधींच्या भेटीपर्यंतचा, पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास
Sonia Gandhi Book, Belonging: A Journey of Love: राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (22 ऑक्टोबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर आपला पहिल्या आत्मचरित्राचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांचे आगामी आत्मचरित्र, “बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह” (Belonging: A Journey of Love) ची एक झलक शेअर केली आहे. आपल्या पहिल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, सोनिया गांधींनी पुस्तकाची पहिली झलक शेअर करताना कृतज्ञता व्यक्त केली.

सोनिया गांधी यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये कॅप्शनच्या माध्यातून त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. सोनिया गांधी यांची पहिली पोस्ट गुरुवारी सकाळी ९ वाजता करण्यात आली. त्यात लिहिले आहे की, “नमस्कार, माझे पुस्तक तुम्हा सर्वांसोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. ही प्रेम, कर्तव्य, प्रियजनांना गमावणे आणि आपलेपणाचे स्थान शोधण्याची कथा आहे. मी हे पुस्तक तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यास उत्सुक आहे.”

Modi-Adani Files News: डिलीट होण्यापूर्वी पाहून घ्या…; राज ठाकरेंनी शेअर केली मोदी-अदांनींवरील ‘ती’ वादग्रस्त डॉक्युमेंट्री

 

व्हिडिओमध्ये सोनिया त्यांच्या जवळच्या मैत्रिणी आणि मुलगी प्रियांका गांधी यांच्यासोबत दिसत आहेत. व्हिडिओदरम्यान प्रियांका गांधींनी आपल्या आई सोनिया गांधींनाही मिठाईसुद्धा खाऊ घातल्याचे दिसते.

केंब्रिजमध्ये राजीव गांधींसोबत झालेल्या भेटीचा उल्लेख

या पुस्तकात सोनिया गांधींच्या इटलीमधील बालपणापासून ते केंब्रिजमध्ये राजीव गांधींसोबत झालेल्या भेटीपर्यंतच्या प्रवासाचे वर्णन देण्यात आले आहे. तसेच, नेहरू-गांधी घराण्यात विवाह झाल्यानंतर आणि कुटुंबातील हत्याकांडांनंतर त्यांच्या आयुष्यात झालेल्या परिवर्तनाचाही यात वृत्तांत आहे.

‘बिलॉन्गिंग’ची सुरुवात सोनिया गांधींच्या युद्धोत्तर इटलीतील व्हेनेटो प्रदेशातील बालपणापासून होते. त्यानंतर, हे पुस्तक त्यांच्या केंब्रिजमधील वास्तव्याचा आणि १९६५ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नातू राजीव गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीचाही उल्लेख करण्यात आला आहे.

या आत्मचरित्रात राजीव गांधींसोबतच्या त्यांच्या विवाहाचे आणि त्यांच्या सासू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीची गोष्टही देण्यात आली आहे. यात हिंदी शिकणे, साडी नेसणे यापासून भारतीय खाद्यसंस्कृती स्वीकारण्यापर्यंत भारतातील जीवनाशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या अनुभवांचाही समावेश आहे.

Pune Division Graduate Teachers MLC Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ला बालेवाडीत मतमोजणी

या पुस्तकात गांधी घराण्यात परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रमुख शोकांतिकांचाही वृत्तांत आहे. यामध्ये संजय गांधी यांचा विमान अपघातातील मृत्यू, १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या आणि १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या यांचा समावेश आहे.

या आत्मचरित्रात २००४ च्या लोकसभा निवडणुकांनंतरच्या राजकीय घडामोडींचेही वर्णन आहे, ज्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा विजय झाला. यानंतर, सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारले आणि पक्ष व आघाडीचे नेतृत्व केले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी पुढील १० वर्षे सत्तेत राहिली.

पतीच्या हत्येनंतरही त्या राजकारणापासून दूर

१९९१ मध्ये पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतरही सोनिया गांधींनी राजकारणापासून दूर राहणे पसंत केले होते. पण पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान झाले. १९९६ पर्यंत काँग्रेस कमकुवत होऊ लागल्याने आणि पक्षात अनेक गटतट निर्माण झाल्याने १९९७ मध्ये, काँग्रेसला पुन्हा एकत्र करण्यासाठी सोनिया गांधी यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व घेतले. ६२ दिवसांनंतर, १९९८ मध्ये, त्या काँग्रेस अध्यक्ष झाल्या. सोनिया गांधी २०१७ पर्यंत अध्यक्ष राहिल्या, जो पक्षाच्या इतिहासातील सर्वात मोठा कार्यकाळ होता.

Ashutosh Ranka- Saurav Das Bail: CJP नेते आशुतोष रांका अन् सौरव दास यांना अखेर जामीन मंजूर

२००४ मध्ये पंतप्रधानपदास नकार

२००४ मध्ये, काँग्रेसने १४ मित्रपक्षांसह यूपीएची स्थापना केली. निवडणुकांनंतर, डाव्या पक्षांसह अनेक पक्षांच्या पाठिंब्याने, यूपीएने ३३५ खासदारांचा पाठिंबा मिळवला. मित्रपक्षांनी सोनिया गांधींच्या पंतप्रधानपदी नियुक्तीला पाठिंबा दिला, परंतु त्यांनी १८ मे २००४ रोजी हे पद नाकारले. त्यानंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले.

मात्र, सोनिया गांधी परदेशी नागरिक असल्याचा मुद्दा उपस्थित करून एनडीएने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या नियुक्तीला विरोध केला. यामुळे सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारले आणि मनमोहन सिंग यांना पंतप्रधान म्हणून प्रस्तावित केले. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. मात्र, असे म्हटले जाते की सोनिया गांधी पडद्याआड राहून सरकारवर नियंत्रण ठेवत होत्य

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोनिया गांधींच्या नव्या पुस्तकाचे नाव काय आहे?

    Ans: सोनिया गांधींच्या आगामी आत्मचरित्राचे नाव 'Belonging: A Journey of Love' (बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह) असे आहे.

  • Que: सोनिया गांधींनी याची घोषणा कशी केली?

    Ans: सोनिया गांधींनी इन्स्टाग्रामवर आपला पहिला अधिकृत व्हिडिओ शेअर करत या पुस्तकाची आणि प्रवासाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

  • Que: या पुस्तकात प्रामुख्याने कोणत्या गोष्टींचा समावेश आहे?

    Ans: इटलीतील बालपण, केंब्रिजमध्ये राजीव गांधींची भेट, भारतात आल्यानंतरचे जीवन आणि कौटुंबिक प्रवासाचे वर्णन यामध्ये करण्यात आले आहे.

Web Title: Sonia gandhi shares memoir belonging a journey of love instagram video as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Sonia Gandhi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.