Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonia Gandhi on Droupadi Murmu: द्रौपदी मुर्मूंबाबत सोनिया गांधीच्या त्या वक्तव्याने राजकारण तापणार..; नेमकं काय आहे प्रकरण?

सरकार महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि महिलांच्या नेतृत्वाखाली भारताला सक्षम बनवण्यावर विश्वास ठेवते. नारी शक्ती वंदन कायदा हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 31, 2025 | 04:03 PM
Sonia Gandhi on Droupadi Murmu: द्रौपदी मुर्मूंबाबत सोनिया गांधीच्या त्या वक्तव्याने राजकारण तापणार..; नेमकं काय आहे प्रकरण?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली:    दिल्ली विधानसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या एका विधानामुळे गोंधळ उडाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रपतींनी बोलावलेल्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनात महामहिमांच्या भाषणावर सोनिया गांधी यांनी केलेल्या भाष्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान पत्रकारांना भेटण्यापूर्वी राहुल, सोनिया आणि प्रियांका संसद भवनासमोर एकमेकांशी बोलत होते. यादरम्यान, जेव्हा राहुल गांधींनी राष्ट्रपतींचे भाषण आवडले का असे विचारले असता सोनियां गांधी यांनी  ” Poor Lady” ( बिचारी महिला)”असं उत्तर दिलं. त्यांच्या याच वक्तव्याने आता राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Devendra Fadnavis: ‘यमुने’वरून राजकारण तापलं; फडणवीसांची केजरीवालांवर टीका; म्हणाले, “तुम्ही आताच

नेमकं झालं काय?

संसदेच्या कामकाजानंतर, संसदेच्या बाहेर राहुल गांधी आणि सोनिया गांधी आपापसात बोलत होते. राहूल गांधी यांनी सोनिया गांधी यांना, राष्ट्रपतींचे भाषण कंटाळवाणे वाटले,राष्ट्रपती फक्त जुन्या गोष्टी पुन्हा सांगत आहेत. अशी म्हटलं. त्यावर  सोनिया म्हणाल्या की,  “राष्ट्रपती खूप थकलेल्या दिसल्या. त्या मोठ्या  मोठ्या कष्टाने बोलत होत्या, बिचाऱ्या.” अशी प्रतिक्रीया दिली.  पण त्याचवेळी  मीडिया कर्मचाऱ्यांचा कॅमेरा आणि माइक चालू होता, ज्यामुळे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड झाला.

दरम्यान,  अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संसदेच्या संयुक्त सभागृहाला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला.  द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की,”सरकार महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि महिलांच्या नेतृत्वाखाली भारताला सक्षम बनवण्यावर विश्वास ठेवते. नारी शक्ती वंदन कायदा हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. याशिवाय, सरकार महिलांसह तरुणांवर विशेषतः लक्ष केंद्रित करत आहे.

‘डब्बा कार्टेल’चा टीझर प्रदर्शित; साई ताम्हणकर, ज्योतिकासह शबाना आझमी दिसणार 

एक देश एक निवडणूक या मुद्द्याचा उल्लेख

महामहिम मुर्मू म्हणाल्या की, सरकारने एक राष्ट्र एक निवडणूक आणि वक्फ सुधारणा विधेयकासारख्या कायद्यांवर जलद पावले उचलली आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना त्यांनी असेही सांगितले की, सरकार अभूतपूर्व कामगिरीद्वारे भारताच्या विकास प्रवासाच्या या अमृत काळाला नवीन ऊर्जा देत आहे. राष्ट्रपती म्हणाल्या की, “एक राष्ट्र, एक निवडणूक आणि वक्फ दुरुस्ती विधेयक यासारखे अनेक महत्त्वाचे मुद्दे जलद गतीने पुढे नेण्यात आले आहेत.

संगम अपघाताबद्दल राष्ट्रपतींनी व्यक्त केले दुःख

महाकुंभमेळ्यादरम्यान झालेल्या संगम दुर्घटनेचा उल्लेख करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, “ऐतिहासिक महाकुंभ सुरू आहे. हा आपल्या सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक प्रबोधनाचा उत्सव आहे. भारत आणि जगभरातील कोट्यवधी भाविकांनी प्रयागराजमध्ये पवित्र स्नान केले.  पण मौनी अमावस्येच्या दिवशी घडलेल्या अपघाताबद्दल मी शोक व्यक्त करते आणि जखमी झालेले भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी  प्रार्थना करते.

Web Title: Sonia gandhis statement regarding draupadi murmu will heat up politics nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • sonia gandhi news

संबंधित बातम्या

Sonia Gandhi: मोठी बातमी! सोनिया गांधींची तब्येत बिघडली; सिमल्याच्या IGMC हॉस्पिटलमध्ये दाखल
1

Sonia Gandhi: मोठी बातमी! सोनिया गांधींची तब्येत बिघडली; सिमल्याच्या IGMC हॉस्पिटलमध्ये दाखल

सोनिया गांधी अन् राहुल गांधींवर ईडीची कारवाई; बड्या नेत्यानं म्हटलं आता प्रत्येक कार्यकर्ता…
2

सोनिया गांधी अन् राहुल गांधींवर ईडीची कारवाई; बड्या नेत्यानं म्हटलं आता प्रत्येक कार्यकर्ता…

National Herald Case : नक्की काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण? ज्याने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सॅम पित्रोदांचं वाढवलंय टेन्शन
3

National Herald Case : नक्की काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण? ज्याने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सॅम पित्रोदांचं वाढवलंय टेन्शन

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ED ची मोठी कारवाई; राहुल गांधी, सोनिया गांधींविरोधात आरोपपत्र दाखल
4

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ED ची मोठी कारवाई; राहुल गांधी, सोनिया गांधींविरोधात आरोपपत्र दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.