Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akilesh yadav Jump over barricade : अखिलेश यादव यांचे फिल्मी स्टाईल आंदोलन; थेट बॅरिकेटवरुन पलिकडे उडी, पोलिसांची दमछाक

राजधानी दिल्लीत एसआयआर विरोधात सुरू असलेल्या निदर्शनादरम्यान, अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवरून उडी मारली. या दरम्यान, दिल्ली पोलिस पाहत राहिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 11, 2025 | 04:33 PM
SP MP Akhilesh Yadav jump over barricades in indian alliance delhi protest video viral

SP MP Akhilesh Yadav jump over barricades in indian alliance delhi protest video viral

Follow Us
Close
Follow Us:

Akilesh yadav Jump over barricade : नवी दिल्ली : दिल्लीमध्ये विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करत महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन इंडिया आघाडीने आंदोलन देखील केले आहे. विरोधी खासदारांनी संसदेच्या मकर द्वारापासून ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांना ताब्यात घेत त्यांचा मोर्चा अडवला. पोलिसांनी खासदारांच्या मोर्चाला निवडणूक आयोगाकडे जाण्यापासून रोखले. पण त्यानंतरही विरोधी खासदार चांगलेच आक्रमक झाले. यावेळी समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव हे फिल्मी स्टाईलमध्ये आंदोलन करताना दिसून आले.

कथित मतदान चोरी आणि विशेष मतदार यादी पुनरावृत्ती विरोधात नवी दिल्लीत इंडिया अलायन्सचे आंदोलन केले. यामध्ये दोन्ही सभागृहातील विरोधी 300 खासदारांनी सहभाग घेत निदर्शने केली. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यानंतर देखील मोर्चा काढण्यात आल्यामुळे पोलिसांनी तो रोखला. निवडणूक आयोगाच्या कार्यालयापासून थोड्या अंतरावर बॅरिकेड्स लावून पोलिस प्रशासनाने खासदारांना रोखले. या दरम्यान, सपा प्रमुख अखिलेश यादव बॅरिकेड्स ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हारयल झाला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

इंडिया अलायन्सच्या या निषेधात जवळजवळ सर्व विरोधी पक्षांचे खासदार आणि प्रमुख नेते उपस्थित होते. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, डिंपल यादव, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्याव्यतिरिक्त, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकचे सर्व खासदार सहभागी झाले होते. यावेळी अखिलेश यादव यांनी पोलिसांची नजर चुकवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

निवडणूक आयोगाच्या कार्यालयापासून थोड्या अंतरावर इंडिया अलायन्सच्या नेतृत्वाखालील निषेध मोर्चा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थांबवला तेव्हा अखिलेश यादव गर्दीतून बॅरिकेड्सवर चढले आणि गर्दीतून बाहेर पडले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ते पत्रकारांमध्ये पोहोचले. या दरम्यान घटनास्थळी तैनात असलेले सर्व पोलिस कर्मचारी पाहत राहिले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

अखिलेश यादव यांनी फिल्मी शैलीत बॅरिकेड्स ओलांडले

पत्रकारांमध्ये पोहोचताच सपा प्रमुखांनी त्यांच्या खिशातून मतदार पुनरीक्षण यादीला विरोध करणारे पोस्टर काढले आणि हवेत फडकावले. यानंतर पत्रकारांनी विचारले की तुम्ही बॅरिकेड्सवरून कशी उडी मारली. यावर अखिलेश यादव यांनी पोस्टरकडे बोट दाखवत म्हटले की आम्हाला यासाठी उडी मारावी लागली. अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवरून उडी मारल्यानंतर, इतर सपा खासदारांनीही मागून बॅरिकेड्सवरून उडी मारण्यास सुरुवात केली. यामुळे पोलिसांची आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची एकच दमछाक झाली.

VIDEO | Samajwadi Party MP Akhilesh Yadav (@yadavakhilesh ) was seen jumping over the police barricade, protesting with banners in hand as protesting opposition MPs were stopped by police barricades at Transport Bhawan while marching towards the Election Commission headquarters.… pic.twitter.com/OtvYEM3NgS

— Press Trust of India (@PTI_News) August 11, 2025

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करताना, विरोधक बॅरिकेड्स ओलांडल्याबद्दल खासदाराचे कौतुक करत आहेत. यासोबतच सपा प्रमुखांच्या फिटनेसचीही चर्चा होत आहे. इंडिया आघाडीच्या या निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. या आंदोलनामध्ये राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव, प्रियांका गांधी आणि संजय राऊत यांना ताब्यात घेतले विरोधी पक्षाच्या खासदारांसमोर पोलिस असहाय्य दिसत होते. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सर्व खासदारांना ताब्यात घेतले. खासदारांना व्हॅनमध्ये भरून मध्य दिल्लीला नेण्यात आले. त्यानंतर निषेध मोर्चा थांबला.

Web Title: Sp mp akhilesh yadav jump over barricades in indian alliance delhi protest video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • Akhilesh yadav
  • INDIA Alliance
  • Samajwadi Party

संबंधित बातम्या

इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज
1

इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर
2

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक
3

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक

Akhilesh Yadav News: ही घ्या पोचपावती…! आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले
4

Akhilesh Yadav News: ही घ्या पोचपावती…! आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.