JNU'मध्ये फडणवीसांच्या कार्यक्रमाला SFI चा विरोध; उपाध्येंचे प्रत्युत्तर; म्हणाले, "डाव्यांच्या विद्यार्थी..."
नवी दिल्ली: नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात म्हणजे जेएनयुमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासनाचे उदघाटन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यभाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये हा उदघाटन सोहळा संपन्न झाला. मात्र देवेंद्र फडणवीस जेएनयूमध्ये या कर्यक्रमासाठी दाखल होताच, त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळेस मंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस या कार्यक्रमासाठी जेएनयूमध्ये दाखल होताच स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेने याला विरोध दर्शवला.
स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यानी या कार्यक्रमाला विरोध केला. जेएनयुमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार का? असा प्रश्न उपस्थित करत या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुख्यमंत्री फडणवीस दाखल होताच या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली.
LIVE | जेएनयू येथे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्रा’ची पायाभरणी आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य व संस्कृती विशेष केंद्रा’चे उदघाटन
🕕 संध्या ६.१२ वा. | २४-७-२०२५📍नवी दिल्ली. #NewDelhi #Marathi #JNU https://t.co/LwcdGVSDad
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 24, 2025
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
मला आज आनंद वाटतो की, नुकतेच युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. तसेच सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषेवर अभ्यास व्हावा यासाठी अध्यासन केंद्र आहे. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. ते विवादाचे माध्यम कधीच होऊ शकत नाही.
केशव उपाध्येंचे आंदोलन करणाऱ्यांना प्रत्युत्तर
‘जनसुरक्षा कायदा मागे घ्या’चे फलक हाती घेऊन ‘एसएफआय’ या डाव्यांच्या विद्यार्थी संघटनेने केलेले आंदोलन हा पुन्हा एकदा छुपा अजेंडा आहे.
https://twitter.com/keshavupadhye/status/1948359609435193829
महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे जेएनयूत सुरु होत असलेल्या सामरिक अध्ययन केंद्राला विरोध हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे. ही तीच मंडळी आहेत, ज्यांनी ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा दिल्या होत्या.