Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court on Bilkis Bano Case: बिल्किस बानोच्या आरोपींना जामीन मंजूर; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Bilkis Bano Case Supreme Court: २००२ साली गुजरात दंगलीदरम्यान बिल्किस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्येशी संबंधित हे प्रकरण आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 16, 2026 | 03:48 PM
Bilkis Bano Case Supreme Court Bail, Vipin Joshi Pradip Modhiya Bail

Bilkis Bano Case Supreme Court Bail, Vipin Joshi Pradip Modhiya Bail

Follow Us
Follow Us:
  • बिल्किस बानो प्रकरणातील दोन दोषींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
  • जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती
  • १७ वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगल्याने जामीन
  • ३ मार्च २००२ रोजी बिल्किस बानो यांच्यावर बलात्कार, कुटुंबातील ७ जणांची हत्या.
Supreme Court on Bilkis Bano Case Update: बिल्किस बानोवरील सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबीयांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोन दोषींना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. बिल्किस बानोवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी विपिन जोशी उर्फ ​​लाला डॉक्टर आणि प्रदीप रमणलाल मोधिया यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देत ​​त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांच्या खंडपीठाने दोन्ही दोषींना हा दिलासा दिला. या दोघांनी १७ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे. विपिन जोशी हा दिव्यांग आहे, तो दोषींपैकी एक आहे.

UP Election 2027 : उत्तर प्रदेशात सत्तांतर होणार? सर्व्हेत भाजप आणि सपामध्ये फक्त ‘इतकाच’ फरक! भाजपचं टेन्शन वाढलं!

प्रकरण काय आहे?

२००२ साली गुजरात दंगलीदरम्यान बिल्किस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्येशी संबंधित हे प्रकरण आहे. दाहोद जिल्ह्यातील रणधिकपूर गावातील बिल्किस, दंगलीदरम्यान आपल्या कुटुंबातील १६ सदस्यांसह पळून गेली आणि जवळच्या छप्परवाड गावातील शेतात लपून बसली.

३ मार्च २००२ रोजी, २० हून अधिक दंगलखोरांनी त्या भागावर हल्ला केला. त्यांनी ५ महिन्यांची गर्भवती असलेल्या बिल्किसवर आणि इतर अनेक महिलांवर बलात्कार केला. त्यांनी बिल्किसच्या ३ वर्षांच्या मुलीसह त्यांच्या कुटुंबातील ७ जणांची हत्याही करण्यात आली.

Patna Chhath Ghat Accident : छठ महापर्वाच्या उत्साहावर विरजण; पुनपुन नदीत बुडालेल्या तिघांचा शोध सुरू

पुन्हा तुरुंगवासाची शिक्षा

२००८ मध्ये, या प्रकरणात ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. गुजरात सरकारने आपल्या १९९२ च्या सुटका धोरणांतर्गत १५ ऑगस्ट २०२२ रोजी सर्व ११ दोषींना मुदतपूर्व सुटका मंजूर केली.

सत्र न्यायालयाने दोन आरोपींना भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम १४३ (बेकायदेशीर जमाव), १४७ (दंगल), ३०२ (खून) आणि ३७६ (बलात्कार) अंतर्गत दोषी ठरवले होते. गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील गोधरा टाऊन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआर प्रकरणात त्यांना तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

बिल्किस बानो यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. ८ जानेवारी २०२४ रोजी, सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारचा सुटकेचा आदेश रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने त्या सर्वांना पुन्हा तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला होता.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बिल्किस बानो प्रकरणातील कोणत्या दोन दोषींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे?

    Ans: सर्वोच्च न्यायालयाने विपिन जोशी ऊर्फ लाला डॉक्टर आणि प्रदीप रमणलाल मोधिया या दोन दोषींच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना जामीन मंजूर केला आहे.

  • Que: सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे?

    Ans: न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने या दोषींना हा दिलासा दिला आहे.

  • Que: या दोषींना जामीन देण्यामागे कोणता मुख्य आधार विचारात घेण्यात आला?

    Ans: दोन्ही दोषींनी या प्रकरणात आतापर्यंत १७ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात शिक्षा भोगली आहे, तसेच विपिन जोशी हा दिव्यांग असल्याची बाब लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

Web Title: Supreme court grants bail to two convicts in bilkis bano case suspends life sentence as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 03:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.