UP Election 2027 Survey: भाजप आणि समाजवादी पार्टीमध्ये अटीतटीची लढत
UP Election 2027 : उत्तर प्रदेशच्या राजकारणात 2027 च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. निवडणुकीला अद्याप काही महिने बाकी असले तरी भाजप आणि समाजवादी पार्टीने राजकीय तयारी सुरू केली आहे. अशातच व्होट वाईबचा एक सर्व्हे समोर आला आहे. (UP Election 2027 Survey)
या सर्व्हेमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीमध्ये फारसा फरक दिसत नसल्याने आगामी निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.
व्होट वाईबच्या सर्व्हेनुसार, 2027 मध्ये मतदान झाल्यास भाजप आघाडीला 41.9 टक्के मतदारांची पसंती मिळू शकते. तर समाजवादी पार्टीच्या आघाडीला 39.1 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे.
दोन्ही आघाड्यांमधील मतांचा फरक अवघ्या 2.8 टक्क्यांचा आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक सोपी नसेल, असं चित्र सर्व्हेतून समोर येत आहे. दुसरीकडे बसपाला 6.4 टक्के आणि इतर पक्षांना 4.9 टक्के पसंती मिळण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, 7.8 टक्के मतदारांनी अद्याप कोणाला मतदान करायचं हे ठरवलेलं नाही.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळीत केला नवा विक्रम; वसंतराव नाईकांचा रेकॉर्ड मोडणार?
या सर्व्हेमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांचा कलही समोर आला आहे. शहरी मतदारांमध्ये भाजपची पकड मजबूत असल्याचं दिसतंय. मात्र ग्रामीण भागात भाजप आणि समाजवादी पार्टी यांच्यात जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.
पश्चिम उत्तर प्रदेशात भाजप मजबूत असल्याचा अंदाज आहे. तर अवध क्षेत्रात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीची पकड चांगली असल्याचं सर्व्हेत म्हटलं आहे. पूर्वांचल आणि बुंदेलखंडमध्ये मात्र दोन्ही आघाड्यांमध्ये चुरस पाहायला मिळू शकते.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात जातीय समीकरणांना मोठं महत्त्व आहे. यादव मतदारांचा कल सपाकडे, तर बिगर यादव ओबीसी मतदारांचा कल भाजपकडे असल्याचं सर्व्हेत नमूद आहे.
दलित मतदारांमध्ये जाटव समाजाचा कल मायावतींच्या बसपाकडे, तर बिगर जाटव मतदारांचा कल भाजपकडे असल्याचं चित्र आहे. सामान्य प्रवर्गातील 66 टक्के मतदार भाजपला पसंती देत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 255 जागा जिंकत सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली होती. मित्रपक्षांसह भाजप आघाडीने 273 जागांवर विजय मिळवला होता. समाजवादी पार्टीला 111 जागा मिळाल्या होत्या.
आता 2027 मध्ये हे चित्र बदलणार की भाजप पुन्हा सत्ता राखणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र सध्याच्या सर्व्हेनुसार दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते.
Ans: सर्व्हेनुसार भाजप आघाडीला 41.9 टक्के, समाजवादी पार्टी आघाडीला 39.1 टक्के, बसपाला 6.4 टक्के आणि इतर पक्षांना 4.9 टक्के पसंती मिळण्याचा अंदाज आहे.
Ans: सर्व्हेनुसार शहरी भागात भाजपची स्थिती मजबूत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातही भाजपला आघाडी असल्याचा अंदाज आहे. तर अवध क्षेत्रात समाजवादी पार्टीची पकड मजबूत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Ans: 2022 च्या निवडणुकीत भाजपने 255 जागा जिंकल्या होत्या. अपना दल (सोनेलाल) आणि निषाद पार्टीच्या जागांसह भाजप आघाडीने एकूण 273 जागांवर विजय मिळवला होता.






