Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संमतीने झालेले शारीरिक संबंध ब्रेकअपनंतर बलात्कार मानता येणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

एखाद्या पुरुषाने नाते संपवण्याचा निर्णय घेतला म्हणूनच त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे योग्य नाही. बलात्काराच्या आरोपाची भीती दाखवून कोणत्याही व्यक्तीला जबरदस्तीने नात्यात राहण्यास भाग पाडता येणार नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 31, 2026 | 07:52 AM
संमतीचे शारीरिक संबंध ब्रेकअपनंतर बलात्कार मानता येणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

संमतीचे शारीरिक संबंध ब्रेकअपनंतर बलात्कार मानता येणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

Follow Us
Follow Us:
  • सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
  •  

    लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा एका व्यक्तीवर आरोप होता.

  •  

    संबंधित प्रकरणात न्यायालयाने आरोपी व्यक्तीला आरोपांतून मुक्त केले.

नवी दिल्ली : प्रौढ युवक-युवतीमध्ये परस्पर संमतीने प्रस्थापित झालेल्या शारीरिक संबंधांना ब्रेकअपनंतर बलात्कार मानता येणार नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. लग्नाचे आश्वासन देऊन संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपांच्या प्रकरणात न्यायालयाने एका व्यक्तीला आरोपांतून मुक्त केले.

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले की, प्रेम आणि परस्पर संमतीच्या नात्यात प्रस्थापित झालेल्या संबंधांना ब्रेकअपनंतर गुन्हा ठरवता येणार नाही. प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण बनवणे चुकीचे आहे. मात्र, सुरुवातीपासूनच लग्नाचे खोटे आश्वासन देऊन किंवा फसवणूक करून संमती मिळवली गेली असेल, तर प्रकरण वेगळे असेल. अशा प्रकरणांमध्ये संमती खरोखरच फसवणुकीवर आधारित होती का, हे पाहणे आवश्यक आहे.

बलात्काराचा आरोप करण्याची भीती दाखवणे चुकीचे

एखाद्या पुरुषाने नाते संपवण्याचा निर्णय घेतला म्हणूनच त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे योग्य नाही. बलात्काराच्या आरोपाची भीती दाखवून कोणत्याही व्यक्तीला जबरदस्तीने नात्यात राहण्यास भाग पाडता येणार नाही.

बलात्कार कायद्याचा गैरवापर होऊ नये

एखाद्याला त्रास देण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी बलात्काराच्या कायद्याचा गैरवापर केला जाऊ नये. परस्पर संमतीने निर्माण झालेले नाते आणि सुरुवातीपासूनच फसवणूक किंवा जबरदस्तीच्या आधारावर निर्माण झालेले नाते यांमध्ये फरक आहे.

बलात्काराच्या प्रकरणात कठोर शिक्षा व्हावी

कोणत्याही प्रकरणात आरोपांची सत्यता आणि उपलब्ध पुराव्यांची तपासणी केल्यानंतरच योग्य कायदेशीर निर्णय घेतला पाहिजे. लैंगिक हिंसा, जबरदस्ती किंवा फसवणुकीचे पुरावे आढळल्यास दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

FAQ (Frequently Asked Questions)

१. सर्वोच्च न्यायालयाने कोणता महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला?

प्रौढ युवक-युवतींमध्ये परस्पर संमतीने झालेले शारीरिक संबंध केवळ ब्रेकअपनंतर बलात्कार ठरत नाहीत, असा निर्वाळा दिला.

२. हा निर्णय कोणत्या न्यायालयाने दिला?

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

३. हे प्रकरण कशासंदर्भात होते?

लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपांशी संबंधित हे प्रकरण होते.

Web Title: Supreme court important ruling about consensual relations nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 07:52 AM

Topics:  

  • Relationship issues
  • Supreme Court of India

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.