रणवीर अलाहबादियाला सुप्रीम कोर्टाचा धक्का
Supreme Court: लोकप्रिय युट्यूबर रणवीर अलाहबादिया, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्व मखीजा, समय रैना आणि ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘इंडिया गॉट लेटेंट’ मधील कथित अश्लील आणि वादग्रस्त टिप्पण्यांबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रणवीर अलाहबादियाविरुद्ध देशातील अनेक शहरांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान दाखल झालेल्या तक्रारींवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी रणवीरने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
लोकप्रिय युट्यूबर रणवीर अलाहबादिया सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या तक्रारींवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी याचिका दाखल केली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने लोकप्रिय युट्यूबर रणवीर अलाहबादियाला झटका दिला आहे. लोकप्रिय युट्यूबर रणवीर अलाहबादियाने दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
रणवीर अलाहबादियाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून तातडीने सुंवणी घेण्याची मागणी केली होती. सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने ही मागणी फेटाळली. येत्या दोन ते तीन दिवसांत सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
रणवीर अलाहबादिया, समय रैनाविरुद्ध तक्रार दाखल!
लोकप्रिय युट्यूबर रणवीर अलाहबादिया, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्व मखीजा, समय रैना आणि ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘इंडिया गॉट लेटेंट’ मधील कथित अश्लील आणि वादग्रस्त टिप्पण्यांबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही बातमी आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. याचदरम्यान आहे संपूर्ण प्रकरण आपण आता जाणून घेणार आहोत.
आरोपींवर कडक कारवाईची मागणी
वृत्तसंस्था एएनआयनुसार, युट्यूबर रणवीर अलाहाबादिया, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्व मखीजा, कॉमेडियन समय रैना आणि ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. शोमध्ये अपशब्द वापरल्याबद्दल मुंबई आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि पत्रात आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काय प्रकरण आहे?
स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो नेहमीच चर्चेत असतो. पण कधीकधी, येथील लोकांना वादग्रस्त प्रश्न देखील विचारले जातात. यावेळी त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यावेळी शोच्या नवीन भागात, युट्यूबर्स आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा, रणवीर अल्लाहबादिया दिसले. शोमध्ये रणवीर इलाहाबादियाने त्याच्या पालकांबद्दल असा प्रश्न विचारला गेला आता त्याच्यावर खूप टीका होत आहे. सोशल मीडियावर या दोघांना ट्रोल केले जात आहे आणि आता त्याच्याविरुद्ध तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
२५ दिवसांनंतर, सैफ अली खानने सोडले मौन; हल्लेखोराबाबत मोठे वक्तव्य, म्हणाला – “त्या बिचाऱ्या…”
रणवीर इलाहाबादिया कोण आहे?
रणवीर हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याला भारतातील सर्वोत्तम YouTube सामग्री पुरस्कार आणि सर्वात स्टायलिश उद्योजक प्रभावशाली पुरस्कार मिळाला आहे. रणवीर इलाहाबादिया यांनी बॉलिवूड, हॉलिवूड स्टार, ज्योतिषी इत्यादी विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. रणवीर नेहमीच त्याच्या पॉडकास्ट, स्टायलिश लूक आणि फिटनेसमुळे चर्चेत असतो. रणवीर ‘बेअर बायसेप्स’ नावाचा एक यूट्यूब चॅनल चालवतो. रिपोर्ट्सनुसार, रणवीर यूट्यूब आणि पॉडकास्टमधून दरमहा सुमारे ३५ लाख रुपये कमावतो.