(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
१६ जानेवारी रोजी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला. चोरीच्या उद्देशाने एका अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला आणि सैफला थांबवले असता त्याने त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्याच्या रात्री अभिनेत्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तो बरा झाला आहे आणि घरी परतला आहे आणि लवकरच शूटिंगमध्ये परतणार आहे. दरम्यान, पहिल्यांदाच, अभिनेत्याने हल्ल्याच्या रात्रीबद्दल संपूर्ण सत्य सांगितले आहे. तसेच अभिनेत्याने हल्लेखोराबाबत मोठे वक्तव्य देखील केले आहे. जे ऐकून अभिनेत्याने पुन्हा एकदा चाहत्यांचे मन जिंकले आहे.
१६ जानेवारीला एका चोराकडून अभिनेत्यावर हा हल्ला केला गेला होता. सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या व्यक्तीने हा हल्ला केलाही बातमी ऐकून सोशल मीडियावर खळबळ पसरली होती. हा हल्ला जेव्हा झाला, त्यावेळी घरात सैफ अली खानशिवाय त्याची दोन मुले आणि करीना कपूरदेखील होती. आता सैफ अली खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या हल्ल्याविषयी आपले मत मांडले आहे. हल्लेखोराबाबत अभिनेता काय म्हणाला हे आपण आता जाणून घेणार आहोत.
सलमान खानने ‘तेव्हा’ जवळून पाहिलेला मृत्यू; म्हणाला, “४५ मिनिटं विमानाच्या इंजिनाचा…”
‘मला कोणापासून तरी धोका…’ अभिनेत्याने सांगितले
सैफ अली खानने स्वतः झालेल्या हल्लाप्रकरणी पहिल्यांदाच ‘दिल्ली टाइम्स’ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी अभिनेत्याने संपूर्ण माहिती सांगितली आहे. तो मनाला की, “माझ्या मुंबईतील घरात अतिरिक्त सुरक्षेसाठी मी कोणतेही शस्त्र ठेवलेले नाही. कारण- मला कोणापासून तरी धोका आहे, असे मला कधी वाटलेच नाही आहे. हा ठरवून किंवा पूर्वनियोजित केलेला हल्ला नव्हता. मला असे वाटते की हा जो चोरी किंवा दरोड्याचा प्रयत्न होता तो पूर्णपणे फसला आहे. त्या बिचाऱ्या व्यक्तीचे आयुष्य माझ्यापेक्षा वाईट झाले आहे.” असे अभिनेत्याने सांगितले आहे.
जर तो त्या खोलीत पुन्हा हल्लेखोराबरोबर असता, तर त्या परिस्थितीत अभिनेत्याने काय केले असते?
असा प्रश्न केल्यानंतर सैफ अली खानने सांगितले की, ‘सगळ्यात पहिल्यांदा मी लाइट लावली असती आणि त्याला विचारले असते की, तुला माहीत आहे का? मी कोण आहे? त्यावर त्याने म्हटले असते की. अरे बापरे! मी चुकीच्या घरात घुसलो आहे. मग मी म्हटले असते की, बरोबर, आता चाकू खाली ठेव. आपण यावर बोलू. मला वाटते की, मी तर्कसुसंगत पद्धतीने विचार केला असता. पण, जेव्हा ती घटना घडली तेव्हा तो राग, संताप, स्वत:ला वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न हे सगळं माझ्या मनात चालू होत. तेव्हा जे काही घडले, ते खूप पटकन आणि सहज घडून गेलेली घटना आहे.
विक्रांत मेस्सीच्या मुलाला झाले १ वर्ष पूर्ण; अभिनेत्याने अखेर चाहत्यांना दाखवला वरदानचा चेहरा!
सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर तो लीलावती रुग्णालयात दाखल झाला होता. तो या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सहा शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. उपचारानंतर पाच दिवसांनी तो घरी परतला. या घटनेनंतर देशभरातून प्रतिक्रिया आल्याचे पाहायला मिळाले. तसेच आता अभिनेत्याची तब्येत देखील चांगली सुधारली आहे. तसेच अभिनेता आता लवकरच कामाला सुरुवात करणार आहे. आणि नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे.