Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ शहराची बातच न्यारी, स्वच्छ शहरापोठोपाठ स्वच्छ हवेमध्येही देशात ठरले अव्वल

स्वच्छ वायु सर्वेक्षण-2024’ चा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये 131 शहरांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत देशातील स्वच्छ शहराने अव्वल क्रमांक मिळवत कमाल केली आहे. त्यामुळे या शहराने इतर शहरांसमोर आदर्श प्रस्थापित केला आहे. जाणून घ्या या शहराबद्दल आणि महानगरपालिकेच्या प्रयत्नाबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Sep 04, 2024 | 08:16 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

देशातील सर्वात स्वच्छ शहरापैकी एक असणाऱ्या  सुरतने  पुन्हा एकदा आपला लौकिक वाढवला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘स्वच्छ वायु सर्वेक्षण-2024’ मध्ये सुरतने देशभरातील तब्बवल  131 शहरांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सुरत महानगरपालिकेने व्यापक दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न आणि सुरतवासीयांच्या सहकार्यामुळे शहराला अव्वल क्रमांक प्राप्त झाला आहे. 2023 मध्ये सुरत शहर 13 व्या स्थानावर होते. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुरतमध्ये PM10 ( पार्टिकुलेट मॅटर किंवा कण प्रदूषण)  मध्ये 12.71% ची लक्षणीय घट झाली आहे. 2023 साली इंदोर शहराने प्रथम क्रमांक पटकावला होता.

सुरत महानगरपालिकेने केलेले प्रयत्न

सुरत महानगरपालिकतर्फे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी  विशेष प्रयत्न केले गेले. त्यामध्ये  घनकचरा व्यवस्थापन,  धूळीचे नियंत्रण, वाहन उत्सर्जनावर नियंत्रण, बांधकाम कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे,  औद्योगिक उत्सर्जन कमी करणे, जनजागृती मोहीम राबवणे, शहरामध्ये परिवहन सेवेसाठी तब्बल 580 इलेक्ट्रिक  बसचा वापर करणे  असे अनेक उपक्रम राबविले गेले. या उपक्रमात लोकसहभागही मोठ्या प्रमाणात असल्याने  याचे फलित म्हणून  या सर्वेक्षणात सुरतला प्रथम क्रमांक मिळाला.

हे देखील वाचा- PM मोदी सिंगापूरला पोहोचण्यापूर्वीच भारतासाठी आनंदाची बातमी; मित्र देश ‘येथे’ मोठ्या प्रमाणात करणार गुंतवणूक

शहराला मिळणार दीड कोटींचे बक्षीस

सुरतच्या शहराला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून ‘नॅशनल क्लीन एअर सिटी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार येत्या 7 सप्टेंबर रोजी जयपूर येथे आयोजित कार्यक्रमात सुरतचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासोबतच शहराला दीड कोटी रुपयांचे बक्षीसही मिळणार आहे.महापौर दक्षेश मावाणी यांनीही शहरवासीयांचे आभार मानून सुरतला देशातील सर्वात स्वच्छ शहर बनविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.  सुरत महानगरपालिकेच्या आयुक्त शालिनी अग्रवाल यांनी या यशाबद्दल शहरवासीयांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

हे देखील वाचा- बॉर्डरवर सर्वात पुढे कोणती फौज तैनात असते? जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

स्वच्छ वायु सर्वेक्षण

केंद्र सरकारकडून  स्वच्छ वायु  सर्वेक्षण हा एक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारणे आहे. या सर्वेक्षणामध्ये घनकचरा व्यवस्थापन, वाहनांचे उत्सर्जन, औद्योगिक उत्सर्जन इत्यादी विविध बाबींच्या आधारे शहरांचे मूल्यमापन केले जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे या स्पर्धेमुळे देशातील शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत.

 

Web Title: Surat city has become the top in the country in terms of clean air after clean city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 08:16 PM

Topics:  

  • india
  • Surat

संबंधित बातम्या

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर
1

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर

Maritime Dispute : जाफना समुद्रात तणाव; श्रीलंकेच्या नौदलाने 12 भारतीय मच्छिमारांना केली अटक आणि बोटही केली जप्त
2

Maritime Dispute : जाफना समुद्रात तणाव; श्रीलंकेच्या नौदलाने 12 भारतीय मच्छिमारांना केली अटक आणि बोटही केली जप्त

Indian Rupee : भारतीय रुपया तुम्हाला बनवेल 20 हून अधिक देशांमध्ये श्रीमंत; जाणून घ्या कुठे अन् किती होणार फायदा?
3

Indian Rupee : भारतीय रुपया तुम्हाला बनवेल 20 हून अधिक देशांमध्ये श्रीमंत; जाणून घ्या कुठे अन् किती होणार फायदा?

Trump Tarrifs : भारतावरील 50% टॅरिफचा अमेरिकेतील ‘मिनी इंडिया’वर मोठा परिणाम; दिवाळीपूर्वी दयनीय स्थिती
4

Trump Tarrifs : भारतावरील 50% टॅरिफचा अमेरिकेतील ‘मिनी इंडिया’वर मोठा परिणाम; दिवाळीपूर्वी दयनीय स्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.