Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punjab Flood : राघव चड्ढा यांच्यानंतर आणखी एका आपच्या खासदाराचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; एका महिन्याचा दिला पगार

जर देशात कुठेही संकट आले तर पंजाबी लोक सेवा करण्यासाठी मोकळ्या मनाने तिथे पोहोचतात. आज पंजाब पुराच्या विळख्यात सापडला आहे, खूप नुकसान झाले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 04, 2025 | 01:17 PM
Punjab Flood : राघव चड्ढा यांच्यानंतर आणखी एका आपच्या खासदाराचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; एका महिन्याचा दिला पगार

Punjab Flood : राघव चड्ढा यांच्यानंतर आणखी एका आपच्या खासदाराचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; एका महिन्याचा दिला पगार

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यात दिल्ली, हिमाचल प्रदेशसह पंजाबमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला आहे. अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे. या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना आता आम आदमी पक्षाचे पंजाबमधील राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पूरग्रस्त राज्यासाठी आपल्या स्थानिक क्षेत्र विकास (एलएडी) निधीतून 3.25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यांच्यानंतर आता खासदार स्वाती मालीवाल यांनीही मदत जाहीर केली.

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी यापूर्वीच मदतीची घोषणा केली. त्यांच्या मदतीनंतर आता राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ज्यामध्ये त्यांनी पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत मागितली होती. स्वाती मालीवाल यांनी पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांचा एक महिन्याचा पगार देणार असल्याचे सांगितले.

देश में कहीं कोई संकट आए तो पंजाबी दिल खोलकर वहाँ सेवा करने पहुँचते हैं। आज पंजाब बाढ़ की चपेट में है, बहुत नुक़सान हुआ है।

मैं अपनी एक महीने की सैलरी पंजाब के बाढ़ पीड़ितों के लिए डोनेट कर रही हूँ। ये बहुत छोटी पहल है लेकिन मुझे उम्मीद है और लोग इस पहल से जुड़ेंगे। वाहेगुरु जी…

— Swati Maliwal (@SwatiJaiHind) September 3, 2025

स्वाती मालीवाल यांनी बुधवारी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘जर देशात कुठेही संकट आले तर पंजाबी लोक सेवा करण्यासाठी मोकळ्या मनाने तिथे पोहोचतात. आज पंजाब पुराच्या विळख्यात सापडला आहे, खूप नुकसान झाले आहे. मी माझा एक महिन्याचा पगार पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी दान करत आहे. हा एक अतिशय छोटासा उपक्रम आहे, परंतु मला आशा आहे की, या उपक्रमात अधिक लोक सामील होतील. वाहेगुरुजी सर्वांना मदत करा’.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि म्हटले होते की, ‘देशावर आलेल्या कोणत्याही आपत्तीविरुद्ध पंजाब नेहमीच उभा राहिला आहे. आज पंजाब संकटात आहे. मी माझ्या सर्व देशवासियांना या कठीण काळात पंजाबच्या लोकांना शक्य तितक्या सर्व प्रकारे मदत करण्याचे आवाहन करतो. आम आदमी पक्षाचे सर्व खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन पंजाब मुख्यमंत्री मदत निधीला देत आहेत. आपण सर्वजण मिळून पंजाबला या भयानक आपत्तीपासून वाचवू या’, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Web Title: Swati maliwal announced to donate one month salary for punjab floods victims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • Heavy Rain

संबंधित बातम्या

राजधानी दिल्लीत पावसाचा हाहा:कार; महापुरामुळे जनजीवन विस्कळीत, यमुना नदीचे पाणी…
1

राजधानी दिल्लीत पावसाचा हाहा:कार; महापुरामुळे जनजीवन विस्कळीत, यमुना नदीचे पाणी…

Maharashtra Rain : विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा; नागपुरात तर…
2

Maharashtra Rain : विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा; नागपुरात तर…

IMD Heavy Rain Alert: पावसाचा कहर थांबेना, हवामान विभागाकडून पुढील 7 दिवसांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी
3

IMD Heavy Rain Alert: पावसाचा कहर थांबेना, हवामान विभागाकडून पुढील 7 दिवसांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी

Maharashtra Rain News: खूप झाली विश्रांती! राज्यात पावसाचे कमबॅक; ‘या’ जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढणार
4

Maharashtra Rain News: खूप झाली विश्रांती! राज्यात पावसाचे कमबॅक; ‘या’ जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.