नवी दिल्ली: राज्यातील नाट्यमय़ घडामोडीनंतर आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेणार आहेत. तर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर सर्वोच्च पदाचा राजीनामा दिला. आतिशी यांच्याकडे दिल्ली सरकारमध्ये शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारखे प्रमुख विभाग आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या माजी विद्यार्थी आणि रोड्स स्कॉलर आतिशी यांनी दिल्लीच्या शाळांमधील शिक्षणामध्ये सर्वसमावेशक सुधारणा घडवून आणण्यासाठी AAP च्या प्रमुख मोहिमेवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे.
पण, दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी आतिशी यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात टीका टीप्पण्ण्या सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी त्यांच्या सोशल मीडियावर, “देव दिल्लीचे रक्षण करो!” असे लिहीत आतिशी मार्लेना यांच्यावर टीका करणारी पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा: अरविंद केजरीवाल यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, आतिशी कधी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ?
दिल्लीसाठी आजचा दिवस अत्यंत दुःखाचा आहे. आज एका महिलेला दिल्लीचे मुख्यमंत्री बनवले जात आहे, जिच्या कुटुंबाने दहशतवादी अफझल गुरूला फाशीपासून वाचवण्यासाठी दीर्घ लढा दिला. दहशतवादी अफझल गुरूला वाचवण्यासाठी त्यांच्या पालकांनी माननीय राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज लिहिला त्यांच्या मते अफजल गुरू निर्दोष होता आणि त्याला राजकीय कटात गोवण्यात आले होते.., असे स्वाती मालिवाल यांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहीले आहे. तसेच, आतिशी मार्लेना या फक्त ‘डमी सीएम’ असल्या तरी हा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. देव दिल्लीचे रक्षण करो! असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
यासोबतच सोशल मीडियावर आतिशी यांच्याविषयी काही सकारत्मक तर काही नकारात्मक पोस्टही शेअर केल्या आहेत. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, दिल्लीचे मुख्यमंत्री बनल्याबद्दल आतिशीजींना शुभेच्छा…
केजरीवाल यांनी हेमंत सोरेनची चूक केली आहे का, दारू घोटाळ्यातील आरोपींऐवजी आम आदमी पार्टीने दहशतवाद्यांच्या समर्थक असलेल्या महिलेला मुख्यमंत्री बनवले आहे, ज्याने अराजकतावाद्यांविरुद्ध लढा दिला आहे परदेशी भूमीवर भारताची बदनामी केली.
हेही वाचा: भारतात 5 विचित्र कारणांमुळे होतात घटस्फोट, जाणून डोक्यावर माराल हात!