Divorce Reasons In India: भारतीय समाजात विवाह हे पवित्र आणि कायमचे बंधन मानले जाते. परंतु बदलत्या काळानुसार, वैवाहिक जीवनात वाढत्या समस्या आणि व्यक्तिमत्वातील संघर्ष यामुळे घटस्फोटाच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. बहुतेक घटस्फोट हे परस्पर सहमती, वैयक्तिक किंवा कौटुंबिक वादांमुळे होतात. पण काही विचित्र कारणेदेखील समोर आली आहेत जी खूपच आश्चर्यकारक वाटू शकतात. भारतात घटस्फोटाची अशी 5 अनोखी आणि धक्कादायक कारणे सांगत आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (फोटो सौजन्य - iStock)
भारतात अनेक विचित्र कारणांनी घटस्फोट घेतले असल्याचे आता समोर आले आहे. यापैकी काही कारणे तर अशी आहेत की तुम्हीही डोक्यावर हात माराल आणि हसाल
नुकतेच उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एका महिलेने लग्नानंतर अवघ्या 40 दिवसांतच पतीकडे घटस्फोटाची मागणी केली असून शरीरातून दुर्गंधी येत असल्याच्या कारणास्तव महिलेने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे
एका विचित्र घटनेत कर्नाटकातील बल्लारी येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीपासून स्वयंपाक येत नसल्याने घटस्फोट घेतला आहे. ती नाश्त्यापासून जेवणापर्यंत फक्त मॅगी बनवायची यामुळे हा घटस्फोट झालाय
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पतीने दावा केला की त्याची पत्नी एका तांत्रिकाच्या सल्ल्यानुसार पत्नी केवळ दिवसातून 4 लाडू सकाळी आणि संध्याकाळी खायला देत असल्याने 10 वर्षाचा संसार घटस्फोट घेत संपवला
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील एका महिलेने शरिया न्यायालयात नवरा तिच्यावर खूप प्रेम करून कधीही भांडण नसून नात्याला कंटाळल्याने घटस्फोट याचिका दाखल केल्याची विचित्र घटना घडली आहे
File Photo : Divorce