K. Annamalai: भाजप अध्यक्षाचा स्वतःला चाबकानं फोडल्याचा Video व्हायरल; 'द्रमुक'विरुद्ध केली 'ही' भीष्म प्रतिज्ञा
तामिळनाडूमध्ये द्रमुक विरुद्ध भाजप असा संघर्ष कायम पाहायला मिळतो. तसेच सध्या तामिळनाडूमध्ये के. अण्णामलाई हे भाजपचे अध्यक्ष आहेत. दरम्यान आता के. अण्णामलाई हे तामिळनाडू सरकारविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी द्रमुक सरकारचा निषेध करण्यासाठी स्वतःला चाबकाने फटके मारून घेतले. त्यांनी स्वतःला चाबकाचे तब्बल 6 फटके मारून घेतले. तसेच काहीही करून द्रमुक सरकारला सत्तेपासून दूर करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आता के. अण्णामलाई हे द्रमुक सरकारविरुद्ध चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे.
2026 मध्ये द्रमुक सरकारचा पाडाव करत नाही तोवर पायात चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. तसेच पुढील 48 दिवस उपवास करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. अण्णा विश्वविद्यालयात एक मुलीवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणाकडे सरकारसह सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःला चाबकाचे फटके मारून घेतले. एका वृत्तसंस्थेने अण्णामालाई यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.
तामिळनाडूमधील अण्णा विश्व विद्यालयात एक मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. अण्णामलाई यांनी स्वतःला चाबकाचे फक्त मारून घेतले तेव्हा भाजपचे काही पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा निषेध करणरे काही फलक देखील यावेळी पाहायला मिळाले. कॉलेजमधील अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या असे फलक देखील दिसून येत आहेत.
#WATCH | Coimbatore | Tamil Nadu BJP president K Annamalai self-whips himself as a mark of protest to demand justice in the Anna University alleged sexual assault case. pic.twitter.com/ZoEhSsoo1r
— ANI (@ANI) December 27, 2024
” ज्यांना तमिळ संस्कृतीची माहिती आहे, त्यांना माझ्या आंदोलनाचा अर्थ समजेल. स्वतःला फटके मारणे, कठोर शिक्षा देणे हे एका चिवट कृतीसारखे आहे. हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. हि कृती कुणाच्या विरोधात नाही. तर राज्यात वाढत असलेल्या अन्यायाविरोधात आहे. अनवाणी राहण्याचा निर्णय मी खूप विचार करून घेतला आहे. माझ्या पक्षाचे कार्यकर्ते देखील कठोर परिश्रम करत आहेतच.”
जोवर तामिळनाडूमधून द्रमुकसरकार जात नाही. त्यांना जोवर सत्तेमधून पायउतार करत नाही तोवर पेंट चप्पल मारून घेणार नाही असे प्रतिज्ञा तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अण्णामलई यांनी केली आहे. तामिळनाडू राज्याला तयाचा गौरव प्राप्त करून द्यायचा असेल तर, 2026 मध्ये द्रमुक पक्षाला सत्तेपासून दूर करावेच लागेल. हे यांचे ध्येय आहे. लक्ष्य आहे. के. अण्णामलई यांनी हे पत्रकार परिषदेत सांगितले आणि त्याच वेळी आपल्या पायातील चप्पल त्यांनी काढून टाकली.
तामिळनाडू मधील अण्णा विश्वविद्यालयात शाळेबाहेरील एक फेरीवाल्याने विद्यापीठातील युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना केली होती. त्यामुळे तामिळनाडूमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी. तसेच त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. भाजप कार्यकर्ते आणि राज्यातील अनेकांनी आरोपीला शिक्षा करण्यासाठी मागणी केली आहे. याच प्रकरणाचा निषेध करण्यासाठी के. अण्णामलई यांनी स्वतःच्या निवासस्थानाबाहेर येऊन पारंपरिक वस्त्र परिधान करून 6 चाबकाचे फटके मारून घेतले.