Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajya Sabha Election 2026: महायुतीत जागावाटप निश्चित; भाजप ४, तर शिंदे आणि अजित पवार गटाला प्रत्येकी १ जागा

महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी या जागेवर आपला दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राज्यसभेची मुदत २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 27, 2026 | 04:30 PM
Rajya Sabha Election 2026: महायुतीत जागावाटप निश्चित; भाजप ४, तर शिंदे आणि अजित पवार गटाला प्रत्येकी १ जागा
Follow Us
Follow Us:
  • पार्थ पवारांच्या एन्ट्रीवर शिक्कामोर्तब
  • भाजपमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी
  • महाविकास आघाडीत एका जागेसाठी रस्सीखेच
 

Rajya Sabha Election 2026 Mahayuti Candidate Name List : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ७ जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभेतील सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार, महायुतीचे पारडे जड असून त्यांच्या वाट्याला ६ जागा येणार आहेत, तर महाविकास आघाडीला (MVA) एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे. महायुतीमध्ये भाजप ४ जागांवर आपले उमेदवार उभे करणार असून, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना प्रत्येकी १ जागा देण्यात आली आहे.

महायुतीचे उमेदवार: ३ नावांवर शिक्कामोर्तब?

मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या ६ जागांपैकी ३ उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाले आहेत. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (AP) पार्थ पवार यांना दिल्लीच्या राजकारणात सक्रिय करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. दुसरीकडे भाजपच्या वाट्याला आलेल्या ४ जागांपैकी २ जागांवर अनुभवी नेत्यांना पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे. तर उर्वरित २ जागांवर नवीन चेहऱ्यांना वाव दिला जाऊ शकतो.

Maharashtra Politics: काँग्रेसला घरघर! ‘या’ बड्या नेत्याचा पक्षाला रामराम; भाजपची ताकद वाढली

शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळेंना कौल?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत एका जागेसाठी सुरू असलेल्या चढाओढीमध्ये माजी खासदाराचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

शिंदेंच्या शिवसेनेची रणनीती: शेवाळे की कीर्तिकर?

शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला आलेल्या एका जागेसाठी पक्षांतर्गत मोठ्या हालचाली सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे. शेवाळे यांचे दिल्लीतील कामाचे अनुभव आणि पक्षनिष्ठेमुळे त्यांना ही संधी दिली जाऊ शकते. याशिवाय ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनीही या जागेसाठी फिल्डिंग लावल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पक्षीय गणिते पाहता शेवाळे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असून, पुढील दोन दिवसांत याची अधिकृत घोषणा होऊ शकते.

मविआला अवघी एक जागा; शरद पवारांच्या उमेदवारीवर सस्पेन्स

राज्यसभेच्या ७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीची (MVA) कसोटी लागणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीला केवळ एकच जागा सुरक्षितपणे जिंकता येणार आहे. मात्र, या एका जागेसाठी मित्रपक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून, उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.

Maharashtra Politics : रोहित पवारांची ही स्टंटबाजी…! राष्ट्रवादीच्याच आमदाराने साधला जोरदार निशाणा

पक्षनिहाय दावे आणि चुरस

महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी या जागेवर आपला दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राज्यसभेची मुदत २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी शरद पवारांनीच पुन्हा राज्यसभेवर जावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, पवारांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

ठाकरे गटाचे संख्याबळ (२० आमदार) आघाडीत सर्वाधिक असल्याने या जागेवर त्यांचा नैसर्गिक दावा असल्याचे बोलले जात आहे. खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची मुदत संपत असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळावी किंवा राजन विचारे, विनायक राऊत यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. तर, काँग्रेसकडे १६ आमदार असून, त्यांनीही या जागेसाठी किंवा आगामी विधान परिषद (MLC) निवडणुकीत जागा मिळावी म्हणून आग्रही भूमिका घेतली आहे.

लक्षणीय बाब म्हणजे, ४६ मते सोबत असल्याने महाविकास आघाडी एक जागा सहज जिंकू शकते. मात्र, महायुतीकडे अतिरिक्त मते असल्याने त्यांनी दुसरा उमेदवार उभा केल्यास मतफुटीची भीतीही नाकारता येत नाही.

 

 

Web Title: Rajya sabha election 2026 seat sharing in the grand alliance is fixed bjp 4 shinde and ajit pawar group 1 seat each

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • BJP
  • Mahayuti Goverment
  • Rajya Sabha Election
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
1

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
2

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
3

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
4

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.