Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर…; भाजप नेत्याने दिले आव्हान

उबाठा गटाचे मराठी भाषा प्रेम म्हणजे पुतना मावशीच्या पान्ह्यासारखे आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 27, 2026 | 04:55 PM
संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर...; भाजप नेत्याने दिले आव्हान

संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर...; भाजप नेत्याने दिले आव्हान

Follow Us
Follow Us:

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनी मराठी भाषेचा ‘उदो उदो’ करायचा आणि शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घ्यायचा, मराठी माणसाला हद्दपार करायचे, मराठी माणसाचा अपमान करायचा आणि अश्लील शिव्या देऊन मराठी भाषेचा अवमान करायचा हे पाप संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि उबाठा गटाने केले आहे. त्यामुळे यांचे मराठी भाषा प्रेम म्हणजे पुतना मावशीच्या पान्ह्यासारखे आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

बन म्हणाले की, खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मराठी भाषेला सन्मान आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्रिभाषा सूत्रामध्ये कुठेही मराठी भाषेला डावलण्यात आलेले नाही. पहिली पासूनची हिंदी भाषेची सक्ती काढून टाकत महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची केली आणि हिंदी भाषेला पर्यायी भाषा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा मराठीचे विद्यापीठ सुरू झाले. राऊत आणि उबाठा गटाचे मराठी भाषेसंदर्भातील योगदान काय आहे हे राऊतांनी सांगावे. इंग्रजी आणि हिंदी पहिल्या इयत्तेपासून सक्तीची करावी ही शिफारस उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली होती त्याबाबत हिंमत असेल तर राऊतांनी उद्धव ठाकरे यांना जाब विचारावा, असे आव्हान बन यांनी दिले.

उबाठा गटाच्या नेत्यांची मुले नेमकी कुठल्या माध्यमाच्या शाळांमध्ये शिकली यांचे उत्तर राऊतांनी महाराष्ट्राला द्यावे असेही ते म्हणाले. महापालिकेमध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना राऊतांना ना मराठी, ना हिंदी, ना इंग्रजी कळत होती. त्यांना केवळ ‘अपना सपना मनी मनी’ हीच भाषा कळत होती असा टोमणा बन यांनी मारला.

बन म्हणाले की, मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना कंत्राटदारांची भाषा मराठी होती की गुजराती होती की केवळ पैशांची होती हे राऊतांनी एकदा संदीप देशपांडेंना विचारावे, असा टोला त्यांनी लगावला. देशपांडे यांनी याबाबत पोलखोल केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

अजितदादांच्या विमान अपघात चौकशीबाबत काल सीआयडीने पत्रकार परिषद घेत त्या विमान अपघाताचा तपास कसा सुरु आहे, आतापर्यंत या तपासात काय काय समोर आले, या तपासाची सद्यस्थिती काय, हे स्पष्टपणे सांगितले. आता अजितदादांचा वारसा आपण चालवावा ही सूप्त इच्छा मनात असलेल्या रोहित पवारांनी संशयकल्लोळ नाटक बंद त्वरित करावे, असे बन यांनी पुन्हा एकदा खडसावले.

हे सुद्धा वाचा : आमदार सदाभाऊ खोत यांनी घेतली मंत्री विखे पाटलांची भेट; केली ‘ही’ मोठी मागणी

Web Title: A bjp leader has challenged shiv sena mp sanjay raut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • BJP
  • sanjay raut
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल’; जंतर-मंतरवरून संजय राऊतांचा इशारा, CJP आंदोलनाला पुन्हा पाठिंबा
1

‘जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल’; जंतर-मंतरवरून संजय राऊतांचा इशारा, CJP आंदोलनाला पुन्हा पाठिंबा

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली
2

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
3

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका
4

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.