Tehseen Syed arrested from Gujarat in connection with Delhi CM Rekha Gupta attack case
Delhi CM Attack News : नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या चर्चेमध्ये आल्या आहेत. रेखा गुप्ता यांच्यावर दिल्लीमध्ये हल्ला करण्यात आला आहे. त्यांचा जनता दरबार सुरु असताना एका व्यक्तीने रेखा गुप्ता यांच्या कानशिलात लगावली. या प्रकरणावरुन दिल्लीसह संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून याचे एक गुजरात कनेक्शन समोर आले आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी तपास सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. रेखा गुप्ता यांना मारहाण केल्याप्रकरणी गुजरात कनेक्शन समोर आले आहे. तहसीन सय्यद नावाच्या व्यक्तीला गुजरातच्या राजकोट येथून अटक करून दिल्लीला आणण्यात आले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की तहसीन हा ऑटो चालक आहे आणि त्याने आरोपी राजेश भाई खिमजी भाई साकारिया यांना २००० रुपये ट्रान्सफर केले होते. तसेच त्यांनी मिळून या घटनेचे प्लॅनिंग केले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मीडिया रिपोर्टनुसार, गुजरातहून अटक करण्यात आलेल्या . तहसीन सय्यद नावाच्या व्यक्तीला रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याची पूर्वकल्पना होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये घटनास्थळाहून अटक करण्यात आलेल्या राजेश सोबत तहसीन सय्यद हा संपर्कामध्ये होता. तहसीन सय्यद आणि राजेशने मिळून दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला प्लॅन केला. राजेशने तहसीन सय्यद याला काहीतरी मोठं केलं पाहिजे असे सांगितले होते.
त्याचबरोबर या प्रकरणातील दोन्ही आरोपी असलेल्या राजेश आणि तहसीन सय्यद यांना पोलिसांनी समोरासमोर बसवून एकत्र चौकशी केली. यावेळी दोन्ही आरोपींनी त्यांच्या आवडी निवडी सांगितल्या. यावेळी दोन्ही आरोपी हे डॉग लव्हर असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर ते दोघे सतत एकमेकांच्या संपर्कामध्ये असल्याचे देखील उघड झाले आहे. या चौकशीवेळी तहसीनने कबूल केले की राजेश त्याला संपूर्ण नियोजन सांगितले होते.
क्राईम न्यूज वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री रेखा गुप्ता हल्ला प्रकरणाच्या पोलीस तपासात असेही समोर आले आहे की आरोपी राजेशने हल्ल्यासाठी चाकू नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या बाहेरून घेतला होता. असे म्हटले जात आहे की त्याने हा चाकू भाजीपाला विकणाऱ्या गाडीतून घेतला होता, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव त्याने मुख्यमंत्र्यांच्या जनसुनावणी शिबिरात पोहोचण्यापूर्वीच चाकू फेकला. आता पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या संदर्भात, पोलिस आरोपीला सिव्हिल लाईन्स परिसरातून ओळख पटवून देत आहेत.