'जावई झाले आता मेहुणे, पत्नी आयोग स्थापन करा'; तेजस्वींचा CM नितीश कुमारांना टोला
बिहारच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसं बिहारचं राजकारणही तापू लागलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बिहार सरकारने नुकताच विविध आयोग आणि मंडळांची स्थापना केली. या आयोगांवर आणि मंडळांवर सत्ताधाऱ्यांचे जमाई, मेहुणे आणि पत्नींना महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यावरून आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनीही मुख्यमंत्री नितीश कुमारांवर टीका केली आहे. जावई झाले आता मेहुणा आणि पत्नी आयोग स्थापन करा, असा टोला त्यांनी लगावला आहे.
तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, राज्य सरकारने अलीकडेच स्थापन केलेल्या आयोग आणि मंडळांमध्ये नियम आणि निष्पक्षता बाजूला ठेवून फक्त सत्ताधारी नेते आणि अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची नियुक्ती केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी आधी ‘जमाई आयोग’ स्थापन केला, आता असं दिसतं की ‘जिजा आयोग’ आणि ‘पत्नी आयोग’ देखील स्थापन केल्याचा आरोप त्यांनी केला.
राजद नेते तेजस्वी यादव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, जमाई आयोग स्थापन केल्यानंतर आता पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही ‘जिजा आयोग’ स्थापन करावा. केंद्रीय मंत्र्यांचे मेहुणे, बिहार सरकारच्या मंत्र्यांचे मेहुणे, खासदाराचे पती इत्यादी अनेकांना दरमहा २,६०,००० लाख रुपये पगार मिळवण्यासाठी कमिशनमध्ये भरले जात आहेत. चिराग पासवान यांचे मेहुणे बनले आहेत. संतोष मांझी यांचे मेहुणे बनले आहेत, एका खासदाराचे पती बनले आहेत, आता किमान मेहररू आयोग तरी करा, असा टोला लगावताना त्यांनी सरकारवर घराणेशाही आणि नातेवाईकांना पदे वाटण्याचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आता ‘जमाई आयोग’ स्थापन करावा, जेणेकरून ‘विशेष जमात’मधील सर्व लोकांना औपचारिक स्थान मिळेल. मुख्यमंत्री नितीश कुमार आता सरकार चालवत नाहीत, तर ‘बेशुद्धावस्थेत’ आहेत. बिहारची खरी कमान मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव दीपक कुमार यांच्या हातात आहे. त्यांचा उल्लेख त्यांनी ‘डीके बॉस’ असा केला आहे.
माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; अमित शहा राहणार उपस्थित
आयोग आणि मंडळांवरील नियुक्तीवरून बिहारचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. सत्ताधारी नेत्यांच्या नातेवाईकांना आणि अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्यात आलं आहे. या मुद्द्यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी नितीश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तेजस्वी यादव यांनी आरोप केला आहे की नुकताच स्थापन झालेला आयोग आणि मंडळांमध्ये निष्पक्षतेकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. या संस्थांमध्ये फक्त अशा लोकांनाच स्थान दिले जात आहे जे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे जवळचे किंवा त्यांचे नातेवाईक आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.