
Telangana government decision deduct 10% salary of employees who not take care of elderly parents
तेलंगणामध्ये, वृद्ध पालकांना त्रास देणे आता मुलांना महागात पडणार आहे. सरकार एक कायदा आणत आहे जो त्यांच्या पालकांची काळजी घेण्यात अयशस्वी ठरणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून १० टक्के कपात करणार आहे. हे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यातून कापले जातील आणि थेट त्यांच्या पालकांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील. यामुळे सरकारी नोकरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालकांना न सांभाळण्यास मोठा फटका बसणार आहे.
हे देखील वाचा : सरकारचा मोठा निर्णय! स्विगी-झोमॅटोची 10 मिनिटांत ‘डिलिव्हरी’ आता इतिहासजमा
पालकांच्या खात्यात पैसे होणार ट्रान्सफर
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी या नवीन आणि महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, जे सरकारी कर्मचारी त्यांच्या पालकांची काळजी घेण्यात अपयशी ठरतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. जर वृद्ध पालकांनी त्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलाविरुद्ध किंवा मुलीविरुद्ध तक्रार दाखल केली तर कर्मचाऱ्याच्या पगाराच्या १० टक्के रक्कम कापली जाईल. ही रक्कम थेट पालकांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल, ज्यामुळे त्यांना सन्मानाने जीवन जगता येईल.
सरकार डे केअर सेंटर्स देखील बांधू शकतात
सीएम रेड्डी म्हणाले की जे लोक आपल्या पालकांची काळजी घेत नाहीत ते समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत आहेत. आपल्या वृद्धांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी हे एक मानवतावादी पाऊल आहे. त्यांनी पुढे सांगितले की सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी “प्रणाम” नावाचे डे केअर सेंटर देखील बांधत आहे.
हे देखील वाचा : दिल्ली-NCR मध्ये भरली हुडहुडी; या राज्यांना थंडीचा यलो अलर्ट, राजस्थानाचा पारा शून्यच्या खाली
इतकेच नाही तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी २०२६-२०२७ च्या अर्थसंकल्पीय प्रस्तावांमध्ये नवीन आरोग्य धोरण आणण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सरकार राज्यातील प्रत्येकाला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. म्हणूनच, पुढील अर्थसंकल्पात नवीन आरोग्य धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे.