Sambhal Violence
संभल: उत्तर प्रदेशातील संभलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर गेल्या दोन दिवसांत संभलच्या मुस्लिम बहुल भागात वीजचोरीच्या घटना उघडकीस आल्या. वीज चोरीचा पाठपुरावा करत असताना वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना मुस्लिम बहुल भागात जुने बंद अवस्थेत शिवमंदिर आढळून आले. सुरूवातीला हे मंदिर 46 वर्षे जुने असल्याची माहिती समोर आली होती. पण या मंदिराबाबत नुकतीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हे मंदिर 1978 पासून बंद होते, या ठिकाणी शिवमंदिर असू शकते हे कोणालाही माहीत नव्हते. शनिवार 14 डिसेंबर 2024 रोजी प्रशासनाकडून वीज चोरांना पकडण्यासाठी या परिसराची तपासणी करत असताना अचानक हे मंदिर बुलडोझरने खोदकाम करताना आढळून आले. धूळ आणि चिखलाने भरलेल्या या मंदिरात हनुमान, शिवलिंग, नंदी आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती सापडल्या. इतकेच नव्हे तर मंदिराच्या परिसरातच एक जुनी विहीरही सापडली आहे. पोलिसांनी कारवाई करून मंदिर हे मंदिर खुले करण्यात आले.
Mandir Found in Muslim Area: मुस्लिमबहुल भागात आढळले 50 वर्षे जुने मंदिर; नक्की काय आहे प्रकरण?
पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार गेल्या 46 वर्षांहून अधिका काळापासून हे मंदिर ठेवण्यात आले होते. पण हे शिवमंदिर तब्बल 46 वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंदिरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांचे घर आहे आणि दीड किलोमीटर अंतरावर शाही जामा मशीद देखील आहे. मुख्य रस्त्यापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास 400 ते 500 वर्षांचा आहे, मग हे मंदिर बंद का ठेवण्यात आले होते? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
संभलचे डीएम याबाबत बोलताना म्हणाले की, ‘हे मंदिर 400 वर्षांहून अधिक जुने आहे. हे मंदिर काबीज करण्याची तयारी सुरू असून वीजचोरीला आळा बसला नसता तर हे मंदिर कधीच मिळाले नसते. त्यावर पुर्णपणे कब्जा करण्यात आला होता. या शिवमंदिरावरील अतिक्रमण करण्याची तयारी करण्यात आली होती. प्रशासनाच्या आदेशानंतर पोलिसांच्या उपस्थितीत हे मंदिर खुले करून अतिक्रमण हटविण्यासाठी बुलडोझरची कारवाई करण्यात आली, त्यामुळे या बंद मंदिराचे अस्तित्व वाचवण्यात यश आले. याबाबत कमल दिवाकर म्हणाले की, याठिकाणी काही वर्षांपूर्वी हिंदु समाज राहात होता. पण त्यानंतर या ठिकाणी दहशतीचे वातावरण तयार झाले, हिंदू कुटुंबांची घरे जाळली जात होती, लहान मुले आणि महिला सुरक्षित नसल्यामुळे याठिकाणाहून त्यांना पळ काढावा लागला.
Maharashtra Cabinet expansion : CM देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप
हे मंदिर 1978 नंतर कधीही उघडले गेले नव्हते. संभल जिल्ह्यात त्यावेळी जे घडले होते त्यामुळे हिंदूंना त्या भागातून पळून जाण्यास भाग पाडले होते. संभलच्या खग्गुसराय भागात जिथे शिवमंदिर सापडले आहे, तिथे पूर्वी मोठ्या संख्येने हिंदू कुटुंबे राहत होती, असा दावा केला जात आहे. 1976 आणि 1978 मध्ये येथे दोन मोठ्या दंगली झाल्या, त्यानंतर मोठ्या संख्येने हिंदूंनी स्थलांतर केले. 1978 मध्ये उसळलेला हिंसाचार इतका गंभीर होता की संसदेने एक तथ्य शोध समिती संभलला पाठवण्याचा विचार केला.
एका हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, संभल जामा मशिदीचे इमाम मुहम्मद हुसैन यांची 1976 मध्ये हत्या करण्यात आली होती. याच भागातील रहिवासी 55 वर्षीय सुशील गुप्ता यांच्याशी झालेल्या संभाषणानुसार, संभल जामा मशिदीच्या मौलानाची 1976 मध्ये हत्या झाली होती. 1979 मध्ये प्रकाशित झालेल्या संसदीय नोंदी आणि एसएलएम प्रेमचंद यांच्या ‘मोब व्हायोलन्स इन इंडिया’ या पुस्तकात मौलानाची हत्या एका हिंदूने केल्याचे नमूद केले आहे. काही काळानंतर मौलानाचे कुटुंब उत्तर प्रदेशातील आझमगडमधील अहिरोला येथे गेले आणि त्यानंतर येथे दंगल उसळली. त्यानंतरच या शिवमंदिराला कुलूप लावण्यात आले.
संभलमध्ये उसळलेल्या हिंसाचार आणि दंगलीनंतर 29 मार्च 1978 ते 20 मे 1978 दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली होती. या दंगलींसंदर्भात एकूण 169 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांपैकी तीन गुन्हे पोलिसांनी नोंदवले आहेत आणि उर्वरित प्रकरणे संभलमधील दोन्ही पंथातील लोकांनी नोंदवली आहेत. 29 मार्च 1978 रोजी झालेल्या निदर्शनात अराजकतावादी घटकही जमावात सामील झाले. त्यावेळी मंजर शफी आणि रंगनलाल यांच्यातील वाद समोर येतो. या काळात जाळपोळ, लुटमार आणि चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या.
मग विविध अफवांमुळे दंगली आणि हिंसाचार वाढला. ज्यामध्ये मंजर शफीची हत्या, मशीद पाडणे, पेश इमाम जाळणे, पोलिस ठाण्याजवळ बांधलेली मशीद उद्ध्वस्त करणे आणि अनेक लूटमार आणि खून झाल्याची चर्चा होती. भीषण परिस्थिती पाहता, विभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले. ठिकठिकाणी जाळपोळ, लुटालूट व खूनाच्या घटना घडल्या तर अनेक ठिकाणी जाळपोळही झाली. त्यानंतर झालेल्या जातीय दंगलीत 10-12 हिंदू मारले गेले, दगडफेक, लूटमार, जाळपोळ आणि गोळीबारात अनेक महिने कर्फ्यू लावला गेला.
IIT मंडीमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात; ज्युनिअर असिस्टंटच्या पदासाठी भरती सुरु
स्वातंत्र्यानंतर संभळमध्ये एक-दोनदा नव्हे तर एकूण 14 वेळा दंगली झाल्या, ज्यामध्ये 1956, 1959 आणि 1966 मध्ये हिंदू-मुस्लिम संघर्ष पाहायला मिळाला. यानंतर 1976 आणि 1978 मध्ये दोन मोठ्या दंगली झाल्या आणि त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला. दोन वर्षांनंतर, 1980 मध्ये येथे पुन्हा हिंसाचार उसळला, ज्यामध्ये 14 लोकांना आपला जीव गमवावा लागला. 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या वेळी संभलमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या.