फोटो सौजन्य - Social Media
सरकारी क्षेत्रात नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी भरतीची सुवर्णसंधी आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मंडीमध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. IIT मंडीमध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. उमेदवारांना २० डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच उमेदवार iitmandi.ac.in या ऑनलाईन संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. तसेच, या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही अटी शर्तीना पात्र असणे अनिवार्य आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवारांनी सुरुवात केली आहे. अर्ज करण्याची विंडो खुली करण्यात आली आहे.
IIT मंडीमध्ये ज्युनिअर असिस्टंटच्या पदासाठी भरतीला सुरुवात झाली आहे. कनिष्ठ सहाय्यक पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करता येत आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र करणे आवश्यक आहे. उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे किमान एका वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. एक वर्षाचा कामाचा अनुभव किंवा उमेदवाराकडे 55 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, जर आपण उमेदवाराच्या वयोमर्यादेबद्दल बोललो, तर या भरतीमध्ये समाविष्ट होण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय 35 वर्षे असणे आवश्यक आहे. तथापि, काही आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वरच्या वयात सूट दिली जाईल.
अशा प्रकारे करता येईल अर्ज
अर्ज शुल्क
आरक्षित वर्गांना अर्ज शुल्कात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तर सामान्य श्रेणीतून येणाऱ्या तसेच EWS वर्गातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करताना अर्ज शुल्क म्हणून ५०० रुपयांची रक्कम भरायची आहे. OBC प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपयांचे अर्ज शुल्क करायचे आहे. तर SC, ST, PH आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ३०० रुपयांची रक्कम भरायची आहे.