
Maharashtra Winter Alert: रेनकोट काढून स्वेटर घाला! राज्यात हुडहुडी वाढणार; 'या' दिवसापासून....
नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीचा जोर वाढत असून, पुढील आठवड्यात काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडच्या उंच भागांत बर्फवृष्टीची शक्यता असल्याने मैदानी राज्यांतही सर्दीत वाढ होणार आहे. दिल्ली, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये पुढील २ ते ४ दिवस दाट धुक्याचे वातावरण राहील.
अनेक ठिकाणी किमान तापमान ५ ते ७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. सध्या डोंगररांगांवर धुक्याची चादर पसरली असून, सकाळ-संध्याकाळची थंडी चांगलीच जाणवत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने १ आणि २२ नोव्हेंबर रोजी दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप भागांत जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
ईशान्य भारतातील मणिपूर, मिजोरम आणि नागालंडमध्येही हलकी ते मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते. पश्चिम यूपी ते पूर्वांचलपर्यंत सकाळी दाट धुके आणि दिवसा हलक्या वाऱ्यांची शक्यता आहे. काही जिल्ह्यांत ९ ते १० अंशांपर्यंत तापमान खाली जात असून, कडाक्याची थंडी सर्वसामान्यांना त्रास देत आहे.
हेदेखील वाचा : दिल्ली बॉम्बस्फोटाचा आरोपी डॉ. उमरचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आले समोर; थेट तुर्कीमध्ये झाले दहशतवादी ट्रेनिंग?