Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राम मंदिरातील दानचोरी प्रकरणातील ‘ते’ रहस्य अखेर उलगडले; SBI कर्मचाऱ्याने…

तपास यंत्रणांना तपासादरम्यान महत्त्वपूर्ण धागेदोरे सापडले आहेत. ज्यामुळे राम मंदिरात देणगी मोजण्याच्या कामात सहभागी असलेल्या बँकेच्या माजी आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 24, 2026 | 07:11 AM
एसबीआय कर्मचाऱ्याने केली चोरी उघड

एसबीआय कर्मचाऱ्याने केली चोरी उघड

Follow Us
Follow Us:

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिरातील दानचोरी काही दिवसांपूर्वी उघड झाली आहे. कोट्यवधींची ही दानचोरी असल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका अहवालानुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एका कर्मचाऱ्यानेच राम मंदिरातील देणगीच्या चोरीबद्दल समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना सर्वप्रथम माहिती दिली होती.

तपास यंत्रणांना तपासादरम्यान महत्त्वपूर्ण धागेदोरे सापडले आहेत. ज्यामुळे राम मंदिरात देणगी मोजण्याच्या कामात सहभागी असलेल्या बँकेच्या माजी आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. २ कर्मचाऱ्यांच्या जबाब आणि पुराव्यांच्या आधारे, मंदिराची गोपनीय माहिती लीक करणाऱ्या दुव्यापर्यंत पोलिस पोहोचू शकले. पोलिसांनी एसबीआयच्या ३ कर्मचाऱ्यांची विशेषतः कसून चौकशी केली असून, त्यांनी या घटनेबद्दल ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना केव्हा आणि कोणत्या माध्यमातून माहिती दिली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

विशेष न्यायाधीश (भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा) रजत वर्मा यांच्या न्यायालयाने अनुकल्प मिश्रा, करुणेश पांडे आणि लवकुश मिश्रा या ३ आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. यापूर्वी अविनाश शुक्ला, रामशंकर मिश्रा आणि मनीष यादव यांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले होते. उर्वरित दोन आरोपी, रामशंकर यादव उर्फ टिन्नू आणि सुभाषचंद्र श्रीवास्तव यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आरोपींपुढे आता उच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

173 साक्षीदारांचे नोंदवले जबाब

आरोपपत्रानुसार, एसआयटीने तपासादरम्यान १७३ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये बँक अधिकारी, सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही ऑपरेटर, सनदी लेखापाल (सीए) आणि रोख मोजणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणातून असे उघड झाले आहे की, मोजणी कक्षात १०५ वेळा रोख रक्कम काढून घेणे आणि लपवणे यांसारखे प्रकार घडले. याशिवाय तपासात ८६ मौल्यवान वस्तूंच्या पावत्याच सापडलेल्या नाहीत.

7000 पेक्षा अधिक पानांचे आरोपपत्र

राम मंदिर दानचोरी प्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयात ७००० हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले. तपासाधिकारी अनेक पेट्यांमध्ये आरोपपत्र, फॉरेन्सिक अहवाल, बँक स्टेटमेंट्स आणि जमा पावत्या घेऊन न्यायालयात पोहोचले.

चंपत राय, मिश्रांचे नाव आरोपपत्रात नाही

९० दिवसांची मुदत संपण्याच्या अवघ्या काही वेळ आधी दाखल केलेल्या या आरोपपत्रात ८ मुख्य आरोपींविरोधात भक्कम कागदोपत्री आणि फॉरेन्सिक पुरावे सादर करण्यात आले आहेत. मात्र, या आरोपपत्रात ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्या नावाचा समावेश नसल्याने न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मोठी बातमी ! राम मंदिरात एक-दोन वेळा नाही तर तब्बल 105 वेळा दानचोरी; SIT कडून सुप्रीम कोर्टात पुरावे सादर

Web Title: Theft of donations at ram mandir by sbi employee exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 07:08 AM

Topics:  

  • Ayodhya ram mandir
  • Ayodhya Ram Temple

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! राम मंदिरात एक-दोन वेळा नाही तर तब्बल 105 वेळा दानचोरी; SIT कडून सुप्रीम कोर्टात पुरावे सादर
1

मोठी बातमी ! राम मंदिरात एक-दोन वेळा नाही तर तब्बल 105 वेळा दानचोरी; SIT कडून सुप्रीम कोर्टात पुरावे सादर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.