West Bengal Elections 2026
BJP on West Bengal: देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. बिहार नंतर पुढच्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. गेल्या काही वर्षांपासू पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचवेळी भाजपनेही सत्तेत येण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, भाजपने फक्त बंगालमध्येच नाही तर बंगालच्या बाहेर राहणाऱ्या बंगाली नागरिकांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोलकाता दौऱ्यावर होते. भाजप बंगाल युनिटचे प्रवक्ते देबजीत सरकार आणि बंगाल विधानसभेचे मुख्य प्रतोद शंकर घोष राजस्थान आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे ते याठिकाणी काय करत होते. असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
देबजीत सरकार आणि शंकर घोष हे दोन्ही नेते पश्चिम बंगालच्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान आणि तामिळनाडूत राहणाऱ्या बंगाली नागरिकांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत होते. देबजीत सरकार यांनी कोटा येथील ३० बंगाली कुटुंबांती भेट घेतली. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, “मी त्यांना सांगितले की जर तृणमूल काँग्रेस पुन्हा जिंकली तर त्यांचे मित्र आणि कुटुंबियांनाही स्थलांतर करावे लागेल. आम्हाला त्यांच्या मदतीची आवश्यकता आहे, कारण बंगालमधील हिंदूंसाठी ही शेवटची लढाई आहे.”
राजस्थानातील कोटामध्ये मोठ्या प्रमाणात बंगाली नागरिक राहता. यातील अनेक नागरिक कायमस्वरूपी रहिवासी आहेत. तर काही स्थलांतरित कामगार, नोकरीसाठी, तर प्रसिद्ध खाजगी संस्थांमध्ये आयआयटी-जेईईची तयारी करणारेही अनेक नागरिक आहेत. राजस्थानमधील काही कायमस्वरूपी बंगाली रहिवासी १९७१ च्या मुक्ती युद्धानंतर बांगलादेशातून भारतात आले होते. त्यांना बांगलादेशातून आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांकडून निर्माण होणाऱ्या धोक्याची जाणीव आहे, असेही देबजीत सरकार यांनी स्पष्ट केले.
बंगालचे भाजप अध्यक्ष समिक भट्टाचार्य म्हणाले की तळागाळातील लोकांकडून मिळालेल्या प्रतिक्रीया पाहता, भाजपने अधिक सक्रीय व्हावे, अशी लोकांची इच्छा आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळासह युरोप दौऱ्यात असताना आम्ही, डेन्मार्क, फ्रान्स आणि इंग्लंडमधील अनेक शहरांमधील बंगाली लोक बांगलादेशी लोकांच्या दुकानांवर बहिष्कार टाकत असल्याचे पाहिले. जरी बांगलादेशी लोक मासे आणि मोहरीच्या तेलाचे मुख्य स्त्रोत असले तरही हा बहिष्कार स्पष्ट दिसून आला. कोपनहेगनमध्ये, बंगाली लोकांनी त्यांनी आयोजित केलेल्या जेवणावळीत मासे देऊ न शकल्याबद्दल त्यांची माफी मागितली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि गैर-भाजपा शासित अशा दोन्ही राज्यांमध्ये सुरू असलेल्या मोहिमेचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. बंगालमधील उपस्थितांची आणि त्यांच्या मित्रांची आणि नातेवाईकांची नावे आणि पत्ते नोंदवले जात आहेत. एका भाजप नेत्याच्या माहितीनुसार, बंगालमधील उपस्थितांचे तसेच त्यांच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराचे नावे व पत्ते नोंदवले जात आहेत. जेव्हा एखादा अनिवासी बंगाली आपल्या कुटुंबीयांना संदेश देतो, तेव्हा स्थानिक भाजप कार्यकर्ते त्यांच्याशी थेट संपर्क साधतात. या उपक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यकर्ते, विशेषतः गैर-भाजप राज्यांमध्ये, संघटनात्मक मदत करत असल्याचेही सांगण्यात आले.
स्थलांतरित बंगाल्यांचे अनुभव
अनिवासी समुदायाशी संवाद साधताना प्रचारक विशेषतः अशा लोकांवर लक्ष केंद्रित करत आहेत जे बंगालमध्ये मतदार म्हणून नोंदणीकृत आहेत आणि ज्यांचे राज्यात नातेवाईक किंवा मित्र आहेत. तसेच, 2011 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या पहिल्या विजयाच्या काळानंतर बंगालमध्ये कायमस्वरूपी उपजीविका न मिळालेल्यांनाही या मोहिमेत लक्ष्य करण्यात आले आहे.
हरियाणाहून नुकतेच परतलेले बंगाल भाजपचे माजी अध्यक्ष राहुल सिन्हा यांनी सांगितले, “ज्या-ज्या राज्यांत आम्ही भेट दिली, तेथील बंगाली स्थलांतरित कामगारांनी स्पष्ट केले की ते परतणार नाहीत कारण बाहेर त्यांची कमाई खूप जास्त आहे. हरियाणात भेटलेल्या काहींनी तर 2026 च्या निवडणुकांमध्ये आमच्यासाठी प्रचार करण्याची तयारी दर्शवली आहे.”