Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल कायदा दहशतवादी संघटनेकडून धमकी, अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याची धमकी; सुरक्षा वाढवली, देशातील मुस्लिमांना…

भारतीय मुस्लिमांनी लक्षात ठेवावं की धर्मनिरपेक्षता ही नरकासमान आहे. हिंदु-मुस्लिम भाईचारा हे धोकादायक ठरू शकते. बाबरी मशीद ३० वर्षांपूर्वी पाडण्यात आली होती. गुजरातमधील अहमदाबादेत २० वर्षांपूर्वी गर्भवती महिलांना बाळासह पोट कापून जाळण्यात आलं होतं.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 06, 2023 | 09:37 AM
अल कायदा दहशतवादी संघटनेकडून धमकी, अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याची धमकी; सुरक्षा वाढवली, देशातील मुस्लिमांना…
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्लीः देशातून एक मोठी व महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संपूर्ण देशाचं श्रद्धास्थान असलेले अयोध्येतील राम मंदिर (Ram Temple) भाविकांसाठी कधी खुलं होणार याची उत्सुकता असताना आणि याबाबत अधिकृत घोषणा गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनी केली असतानाच, या मंदिराबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याची धमकी अल कायदा (al Qaeda) या दहशतवादी संघटनेने दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं एकच खळबळ माजली असून, परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली असून, पोलीस फौजफाट मोठ्या प्रमाणत तैनात करण्यात आला आहे.

[read_also content=”राज्यात काही भागात ढगाळ वातावरणामुळं अवकाळी पावसाची शक्यता; अनेक पिकांना फटका बसण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत… https://www.navarashtra.com/maharashtra/chance-of-unseasonal-rain-due-to-cloudy-weather-in-some-parts-of-the-state-many-crops-are-likely-to-be-hit-farmers-are-worried-359584.html”]

दरम्यान, जिहादी समूहाच्या एका ऑनलाइन पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात गरळ ओकण्यात आली आहे. भारतातील सर्व मुस्लिमांना या जिहादमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. सदर 110 पानांचे नियतकालिक आहे. संपादकीयात म्हटलंय की, ज्या प्रकारे बाबरी मशिदीच्या ढाच्यावर राम मंदिर बांधण्यात येतंय, ते पाडलं जाईल. मूर्तींच्या जागी अल्लाहच्या नावाने बाबरी मशिद बांधली जाईल. या सगळ्यासाठी बलिदान हवंय. असं भारतातील मुस्लिमांना आवाहन करण्यात आलं आहे.

पुढे असं ही म्हणण्यात आलंय की, भारतीय मुस्लिमांनी लक्षात ठेवावं की धर्मनिरपेक्षता ही नरकासमान आहे. हिंदु-मुस्लिम भाईचारा हे धोकादायक ठरू शकते. बाबरी मशीद ३० वर्षांपूर्वी पाडण्यात आली होती. गुजरातमधील अहमदाबादेत २० वर्षांपूर्वी गर्भवती महिलांना बाळासह पोट कापून जाळण्यात आलं होतं. आज सर्वत्र बुलडोझर चालवण्यात येत आहेत. जामिया मिलिया (इस्लामिया) आणि अलीगडपासून जामिया उस्मानिया (हैदराबाद उपनगर) तसेच देवबंद शहरापर्यंत हिंदूंकडून धोका आहे. त्यामुळं तुम्ही जिहाद धर्म वाचविण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन अलं कायद या संघटनेनं केलं आहे.

Web Title: Threat from al qaeda terrorist organization threat to blow up ram temple in ayodhya increased security muslims in the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2023 | 09:37 AM

Topics:  

  • Al Qaeda
  • ram mandir

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.