हैदराबादहून दुबईला जाणारे एअर इंडियाचे (air india flight) विमान हायजॅक करण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी सोमवारी ईमेलद्वारे देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद-दुबई एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करण्याची धमकी देणारा ईमेल एका अज्ञात व्यक्तीने विमानतळ प्राधिकरणाला पाठवला होता. विमानतळ प्राधिकरणाने सर्व माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.
[read_also content=”शाहरुख खानला वाय प्लस सुरक्षा! पुन्हा धमक्या मिळाल्यानं किंग खानच्या सुरक्षेत वाढ, नेमकं प्रकरण काय? https://www.navarashtra.com/latest-news/y-plus-security-provided-to-shahrukh-khan-amid-threatening-nrps-467504.html”]
धमकी मिळताच एअर इंडियाचे विमान रिकामे करण्यात आले आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. मात्र पोलिस तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरोधात चौकशी सुरू केली आहे. उड्डाण तपासणीत असे काहीही आढळून न आल्याने हा हॉक्स कॉल असू शकतो, असे मानले जात आहे, मात्र ईमेल मिळाल्यानंतर विमानतळावर तातडीने तपास करणे आवश्यक होते.
रिपोर्ट्सनुसार, 8 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता विमानतळावर ड्युटीवर असताना अधिकाऱ्याला एक ईमेल आला. ज्यामध्ये इशारा देण्यात आला होता. ईमेलमध्ये म्हटले आहे की फ्लाइटमध्ये बसलेला एक व्यक्ती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा गुप्तचर आहे आणि त्याच्याबद्दल सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तसेच, तो प्रवासी फ्लाइट क्रमांक AI951 हायजॅक करू शकतो. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरू आहे.