Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्रिपुरामध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत; सुविधा पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारकडून 25 कोटींची तरतूद

त्रिपुरामध्ये मुसळधार पावसामुळे राज्याला जोरदार पूरस्थितीचा फटका बसला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. काही लोकांनी आपले प्राण देखील गमावले. या पूरस्थितीतून परिस्थिती सुधवरण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत करण्यात आली होती. मात्र ही मदत पुरेशी नसल्याचे विरोधकांनी म्हटल्यानंतर राज्य सरकारने देखील कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 02, 2024 | 12:23 PM
tripura floods 2024 news state government provision

tripura floods 2024 news state government provision

Follow Us
Close
Follow Us:

त्रिपुरा : त्रिपुरा राज्याला पुराचा फटका बसला आहे. विनाशकारी पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. यामध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे संसार अक्षरशः पाण्याखाली गेले आहेत. यानंतर केंद्र सरकरकडून त्रिपुरासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. केंद्राने पूरग्रस्त त्रिपुराला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून (NDRF) कोट्यवधी रुपये देण्यास मान्यता दिली. मात्र ही मदत पुरेशी नसल्याची टीका विरोधकांनी केली. यासाठी कॉंग्रेसने मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर आता त्रिपुराच्या राज्य सरकारने देखील पूरस्थितीतून बाहेर येण्यासाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.

त्रिपुरामध्ये पावसाने सर्व विक्रम मोडत जोरदार हजेरी लावली. यामुळे वस्त्यांमध्ये पाणी शिरले. ऑगस्टमध्ये विक्रमी प्रमाणात झालेल्या पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि खाजगी मालमत्ता, पायाभूत सुविधा आणि पिकांचे नुकसान झाले झाले. सुमारे 15,000 रुपये प्रत्येकाला देण्याची मागणी केली होती. त्रिपुरा प्रदेश काँग्रेसने सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत पूरग्रस्तांना पुरेशी मदत देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला. यासाठीत्यांनी रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये शेतकरी, मत्स्यपालन मालक आणि भूस्खलन आणि पुरामुळे जीवन गमावलेल्या इतर कामगार वर्गाच्या लोकांना योग्य नुकसान भरपाईची मागणी केली होती. आंदोलकांनी राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध केला. विरोधकांच्या या तीव्र विरोधानंतर त्रिपुरा राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

हे देखील वाचा : सुनील तटकरे यांचं नशीब बलवत्तर; ‘त्या’ हेलिकॉप्टरमधून करणार होते प्रवास, पण…

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली. माणिक साहा यांनी सांगितले की, राज्याला पूराच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. ऑगस्टमधील विनाशकारी पुराचा तडाखा बसलेल्या गुजरात, मणिपूर आणि त्रिपुरासाठी केंद्राने एक दिवसापूर्वी 675 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची (AB-PMJAY) सहा वर्षे आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या तीन वर्षांच्या राज्यस्तरीय समारंभाच्या निमित्ताने आगरतळा येथील प्रज्ञा भवन येथे पत्रकारांशी बोलताना साहा यांनी याबाबत घोषणा केली. ते म्हणाले की, “पूरस्थिती दुरुस्तीसाठी 5 कोटी केंद्राने दिले आहेत. यापूर्वी देखील केंद्र सरकारने पूरसंकटामध्ये मदतीसाठी 40 कोटी रुपये दिले होते. पायाभूत सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी आणि राज्यभरातील पुरग्रस्त  लोकांना मदत देण्यासाठी हा निधी वापरला जाईल,” असे आश्वासन त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी दिले आहे.

Web Title: Tripura floods disrupt life 25 crore provision from the state government for restoration of facilities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 12:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.